वैजापुरच्या रिक्षाचालकाची मुलगी प्रिया विशेष प्राविण्यासह उत्तीर्णवैजापुर(प्रतिनिधी)/राहुल त्रिभुवन

वैजापुर च्या भारतीय ग्रामीण पुनर्रचना संस्था औरंगाबाद संचलित छत्रपती शाहू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनी प्रियाने शाळेतून 87 टक्के घेत तृतीय क्रमांक पटकावत विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाली असून वैजापुर मधिल रिक्षाचालक यांसाठी ही अभिमानाची बाब आहे तसेच  उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक के पी डोंगरे, शिक्षक एस एन सय्यद , शिक्षिका वाय एम काझी , एस डब्लू देशमुख , वाय डी राजपूत  तसेच मार्गदर्शक राहुल त्रिभुवन यांचेही प्रियाला मार्गदर्शन लाभले.प्रिया चे वडील हे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविण्यासाठी रिक्षा चालवितात त्यातच मुलांचे शिक्षण,घरातील खर्च,अचानक पने येणारा दवाखाण्यातील खर्च हे सर्व फक्त वडील काशिनाथ सोळसे यांच्यावर या सर्व बाबींची जबाबदारी होती. मागासवर्गीय असून सुद्धा विचार मागासलेले नाही हे प्रिया ने सिद्ध करून दाखवले. आई वडिलांची होणारी फरफट व मेहनत प्रिया स्वतः बघत होती.घरात हलाखीची परिस्थिती असताना देखील आई वडिलांनी प्रिया ला शिकवले व तिनेही या गोष्टीचे चीज केलेच.डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे अन जो पितो तो गुरगुरल्या शिवाय राहत नाही कदाचित हेच शिक्षणाचे महत्त्व ओळखून प्रियाने एक संकल्प हाती घेऊन शालांत प्रमाणपत्र परीक्षेत सेमी माध्यमातून 87 टक्के गुण घेऊन शाळेतून तिसरा येण्याचा मान मिळवला.यात तिची जिद्द,महत्वकांक्षा,अभ्यासु वृत्ती,प्रामाणिकपणा आणि दूरदृष्टी या गुणांचा परिचय तिच्या स्वभावातून बघावयास मिळतो.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून  लहुजी साळवे सामाजिक प्रतिष्ठान व लहुजी शक्ती सेना यांनी अण्णाभाऊ साठे सभागृहात निमित्ताने गुणवंत विद्यार्थी सत्कार ठेवला होता तेव्हा प्रियाला  याप्रसंगी आ,रमेश बोरणारे,माजी नगराध्यक्ष डॉ,दिनेश परदेशी,उपनगराध्यक्ष साबेरखान
तालुका शिवसेना प्रमुख बंडू वाणी, शहर प्रमुख
राजेंद्र साळुंके,नगरसेवक गणेश खैरे,इम्रान कुरेशी,शैलेश चव्हाण,ज्ञानेश्वर टेके,बबन त्रिभुवन,कडू
त्रिभुवन,कारभारी त्रिभुवन,भूषण निंबाळकर,सोनू
राजपूत  यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये तिला प्रमाणपत्र देऊन तिचा सन्मान करण्यात आला तसेच प्रगती करिअर अकॅडमी चे संचालक मार्गदर्शक राहुल त्रिभुवन यांनी सुद्धा तिच्या यशाचे कौतुक करून तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Post a comment

0 Comments