एक सच्चा शिवसैनिक साबेर खान यांना महामंडळ मध्ये घेण्याची मागणी


वैजापूर(प्रतिनिधी/राहुल त्रिभुवन) : 

   महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून विधान परिषदेमध्ये पक्षाने नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा विचार केला आहे.असाच एक लोकनेता व  जनसेवक साबेर खान यांचा सुद्धा विचार व्हायला हवा. वैजापूर तालुक्यात एक सच्चा शिवसैनिक म्हणून आज पर्यंत त्यांची ख्याती असून समोर कितीही आव्हान असू द्या परंतु त्यांना न  घाबरणार व्यक्तिमत्व म्हणजे साबेर खान.
 समाजसेवा आणि समाजसेवेच्या च्या माध्यमातून राजकीय नेते असा त्यांचा प्रवास आहे. महाविकास आघाडी मधील शिवसेना या पक्षाने साबेर खान यांची  महामंडळ वर नियुक्ती करावी अशी मागणी वैजापूर येथील शिवसैनिकातून होताना दिसत आहे. वैजापूर तालुक्यातील एक सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तिमत्व ज्यांनी आपल्या कर्तृत्वातून एक सर्वसाधारण, सर्वसामान्य कार्यकर्ता, नगरसेवक ते उपनगराध्यक्ष म्हणून शिवसेनेचा खंबीर कार्यकर्ता, नेता म्हणून आपली छाप पाडली.ज्या वेळेस जिल्ह्यातील अनेक नेते पक्ष सोडून जात होते त्या पडत्या काळात शिवसेनेला पक्की गाठ बांधून एक शिवसैनिक म्हणून एक समाजसेवक म्हणून मागील 40 वर्षांपासून टिकून आहे. शिवसेना पक्षातून अनेक कार्यकर्ते मोठे झालेले अनेक मोठे पद भुषविले परंतु सर्वसामान्य,गोरगरीब, दीनदुबळ्या लोकांचा खरा समाजसेवक शिवसैनिक म्हणून ज्यांनी आपली प्रचिती लोकांमध्ये सर्वसाधारण पणे राहून आपली छाप पाडली अशा कर्तुत्ववान, निष्ठावंत शिवसैनिक माजी नगराध्यक्ष व विद्यमान उपनगराध्यक्ष शिवसेना नेते साबेर खान (भाई) यांची जिल्ह्यामध्ये आणि तालुक्यामध्ये राजकारणामध्ये एक वेगळी ओळख उमटलेली आहे.
 साबेर भाई यांनी स्वतःसाठी कधीही पदाची  शिफारस केली नाही आणि जीवनात करणार पण नाही.अशा सर्वसामान्य व्यक्तिमत्त्वाला ज्यांनी आपलं व्यक्तिमत्व शून्यातून निर्माण केलं अशा शिवसैनिकास महामंडळात स्थान मिळावे अशी मागणी होत आहे. आज कोरोना सारख्या महामारी युद्धाच्या काळामध्ये आपली जबाबदारी म्हणून ज्या घरांमध्ये चूल पेटत नाही अशा कितीतरी घरांचा आधार  म्हणून आजही  साबेर खान आपलं कर्तव्य बजावत आहे म्हणून साबेर खान यांची मंडळावर नियुक्ती करावी अशी मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप, तालुकाप्रमुख सचिन वाणी , शहरप्रमुख राजेंद्र साळुंके, नगरसेवक प्रकाश चव्हाण, मानाजी मिसाळ, अविनाश पा गलांडे आदींनी केली आहे.

Post a comment

0 Comments