पाण्याच्या टाकीची स्वच्छता न करणाऱ्या दोषींवर कारवाई साठी युवकांचे उपोषण


 फुलंब्री (प्रतिनिधी गजानन इधाटे)


फुलंब्री तालुक्यातील वाघलगाव व येथे 23 जुलै रोजी गंभीर प्रकार झाल्याचे आढळून आले.गावातील महिला पाणी भारत असताना त्यांना घाणेरडा वास येत असल्याने तसेच काही नळातून अळ्या येत असल्याने एकच खळबळ उडाली होती. पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये काहीतरी सडलेले असावे असे अनुमान काढणे सुरू झाले .पाणीपुरवठा कर्मचारी यांनी शोधाशोध सुरू केल्यानंतर पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मृत वानर सडलेल्या अवस्थेत आढळले होते.त्या माकडाच्या शरीराचा गाळ होऊन पाण्यात पसरलेला होता .सर्वत्र टाकीत अळ्या सुद्धा आढळून आल्या .हे दूषित पाणी गावकर्यांनी प्रकार उघडकीस येई पर्यंत पिले .घडलेला प्रकारची माहिती ग्रामसेवक काथार व्ही आर दूरध्वनीवरून दिली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली संबंधित प्रकारची गटविकास अधिकारी पंचायत समिती .तहसीलदार, मुख्यकार्यकारी अधिकारी औरंगाबाद यांच्याकडे धाव घेऊन ग्रामसेवक व ग्रामपंचायत कार्यालय वाघलगाव यांच्या बेजबाबदारपणामुळे हे दुषित पाणी पिऊन गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले.अशी तक्रार आम्ही गावकर्यांनी केली.  यावर गटविकास अधिकारी पंचायत समिती   यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी   अधिकारी विस्तार अधिकारी एस एम शेंगुळे यांच्या समवेत उपस्थित राहून गावकऱ्यांच्या समक्ष दि 24 जुलै रोजी पंचनामा केला. गावकर्यांना सदरील पंचनामा वाचून दाखविताना सदरील प्रकार अतिशय गंभीर आहे ,या ठिकाणी पाण्याच्या टाकीत व मृत माकडाच्या शरीरातील मांसाचे  तुकडे आणि दुर्घन्धी आढळुन आल्याचे स्पष्ट केले .परंतु लेखी स्वरूपातील अहवालात असा उल्लेख केलेला नसल्याने दुसऱ्या दिवशी प्राप्त सत्यप्रत इथून दिसून आले.हा प्रकार सर्व अधिकारी मिळून गावकऱ्यांच्या जीवाशी खेळण्यासारखा आहे.करीत आम्ही समस्त गावकरी आपणाकडे धाव घेत आहेत आहे की आपण संबंधीत अधिकारी ग्रामसेवकास शासकीय प्रतिनिधी या नात्याने घडलेल्या प्रकारास जबाबदार धरून 19 ऑगस्ट2020 परेंत कारवाई न केल्याने कोरोना काळात शासकीय नियमाचे पालन करून सर्व ग्रामस्थांच्या वतीने डॉ गणेश सारंगधर काकडे ,योगेश तुकाराम सुरडकर ,अनिल मधुकर गोंडाळ आदी गुरुवार दि 20 ऑगस्ट पासून अन्नत्याग करूनजिल्हाधिकारी कार्यालयालयासमोर उपोषणाला बसले आहे.

Post a comment

0 Comments