पंतप्रधान नरेंद्र मोदी'जी आंतरराष्ट्रीय 'शिवस्मारक' मुंबईत कधी -संभाजी ब्रिगेड


निलेश जांबले दौंड-पुणे
मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे 'शिवस्मारक' कधी पुर्ण होणार...? साडेतीन वर्षापूर्वी भाजपचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी'जी दि. २४ डिसेंबर २०१६ रोजी मुंबईत शिवस्मारकाचे उद्घाटन (जलपुजन) करून गेले, नंतर फिरकलेच नाहीत. त्या शिवस्मारका'चे प्रत्यक्षात काम अजून सुरू झालेलं नाही. मतांच्या राजकारणासाठी केलेली दिशाभूल होती असच वाटतं. मग मा. मोदीजी राम मंदिराचे उद्घाटन करून राम मंदिर बांधतील का यावर शंका आहे. मात्र नरेंद्र मोदींनी शिवप्रेमींना 'फसवलं' यात तिळमात्र शंका नाही. कारण मोठा डामडौल करून राज्यासह देशातील शिवप्रेमी जनतेला वेड्यात काढल गेलं आहे. मुंबईत छत्रपती शिवाजी महाराजांचे आंतरराष्ट्रीय शिवस्मारकाचे 'उद्घाटन झाले... परंतु शिवस्मारकाचे काम पुर्ण होण्यासाठी सुध्दा हजारों शिवप्रेमींना स्वतःचे प्राण द्यावे लागतील का...? तरच काम पुर्ण होईल.

मुंबई आंतरराष्ट्रीय दर्जाचे छत्रपती शिवाजी महाराजांचे 'शिवस्मारक' व्हावा यासाठी वीस वर्षापासून संघर्ष सुरू आहे. मात्र शिवप्रेमींना गाजर देऊन गप्प बसले. भावनिक मुद्दा करून राजकारण केलं जातं हा इतिहास आहे. अरबी समुद्रात शिवस्मारक होऊ शकणार नाही असं असताना सुद्धा जाणीवपूर्वक केंद्रातील व राज्यातील राज्यातील सरकारने केला. महाराष्ट्रात 5 वर्षे राज्यात सत्ता भोगून ही केंद्रातील मंडळी मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिवस्मारक अजूनही उभा करू शकले नाहीत. शिवस्मारकाची एक वीट सुद्धा अजून बसवण्यात आलेली नाही. मात्र राम मंदिराचा मुद्दा पुढे आणून नरेंद्र मोदी पाच तारखेला परत उद्घाटनाचा इव्हेंट केला. हजारो कारसेवक तरुणांनी स्वतःचा जीव दिला. मात्र त्यांच्या कुटुंबाची आज कुणाला काळजी अथवा आठवण येत नाही. राम मंदिर उभारणारी संस्था राम जन्मभुमी न्यास ही संस्था RSS ची संस्था पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांना बोलून उद्घाटन करणार आहेत मग आमच्या शिवस्मारकाचे काय...? मुंबईत शिवस्मारक 'अरबी समुद्रात' करा किंवा 'जमिनी'वर तयार करा मात्र लवकर काम सुरू झालं पाहिजे...  अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे

Post a comment

0 Comments