कुणी मुरूम टाकुन देता का या रस्त्यावर ?....रस्ता दुरूस्तीसाठी नारायणपुर येथील शेतकर्याची सोशल मिडियावर लोकप्रतिनिधीकडे मागणी..


वैजापूर(प्रतिनिधी/राहुल त्रिभुवन) : 


वैजापुर - तालुक्यातील नारायणपुर हिगोणीं, कांगोणी सह सर्वच गावातील रस्त्याची एक महिण्यापासुन अत्यंत दयनीय अवस्था झाली असुन नारायणपुर व लाडगाव या गावांना जोडणाऱ्या या रस्त्याची दोन्ही बाजुने दुरूस्ती झाली मात्र दोन्ही मधील हिगोणीं कांगोणी शिवारातील एक किलोमीटर रस्ता दुरूस्तीविना रखडलेला तसाच असल्याने दोन्ही बाजुने लाखो रुपये खर्च करून रस्ता बनविला मात्र मधलाच रस्ता अत्यंत दयनीय अवस्थेचा झाला आहे या एक किलोमीटर रस्त्यावर ना बैलगाडी ना पायी चालता येते तसेच मोटारसायकलही चालत नसल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात असुन गुरूवारी येथील शेतकऱ्यांनी या रस्त्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल करून कुणी या रस्त्यावर मुरूम टाकुन देता का अशी आर्त हाक लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडे करण्यात आली आहे त्यामुळे आता प्रशासन व लोकप्रतिनिधी या रस्त्याकडे लक्ष देतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a comment

0 Comments