वांजोळा गाव विकासापासून वंचित दीड किलोमीटर चिखलमय रस्त्याने पायी चालणे व वाहनचालविणे झाले अवघडसिल्लोड - तालुक्यातील वांजाेळा  गाव ते वांजाेळा  फाटा या रोडची 

सदरील दीड किलोमीटर  रोड  बांधकाम विभाग दुर्लक्ष करत असल्याने सदरील रोड तात्पुरत्या स्वरूपात का होईना दुरूस्ती करण्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न गावक-यांना पडला आहे.मागील दोन महिन्यापासून मुसळधार पाऊस पडत असल्याने या दीड  किलोमिटर रस्त्यावरील संपुर्ण डांबर व खडी मोठ्या प्रमाणात वाहुन गेली असल्याने रोडवर चिखल साचत असुन मोठ मोठे खड्डे पडलेले आहे.रोडवर पडलेल्या चिखलामुळे व खड्यामुळे नागरिकांना पायी चालणे देखील अवघड होऊन बसले आहे.मोटरसायकल व चारचाकी वाहन स्लीप होऊन रोडच्या आजुबाजुच्या बराशीत जाण्याची भिती निर्माण झाली आहे.या रोडने चारचाकी वाहन समोरासमोर आल्यानंतर एकमेकांना साईड देतांना वाहन चिखलात फसण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.तरी संबंधीत विभागाने सदरील रोडची जबाबदारी घेऊन तात्पुरत्या स्वरूपात का होईना रोडची दुरूस्ती करून देण्याची मागणी गावक-यांकडुन करण्यात येत आहे.नसता सिल्लोड-भराडी रोडवर असलेल्या वाजाेळा फाट्यावर रस्ता रोको करण्यात येणार असल्याचे वाजाेळा येथील गावक-यांनी सांगितले.

Post a comment

0 Comments