तलवार घेऊन फिरणारा समाजकंटक अडकला पुंडलीकनगर पोलिसांच्या तावडीत


औरंगाबाद 12ऑगस्ट : दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने हातात तलवार घेऊन फिरणाऱ्या रिकॉर्डवरील समाजकंटकाला पुंडलीकनगर पोलिसांनी आज बीएसजीएम शाळेच्या ग्राउंडवरुन अटक केले.

पुंडलीकनगर पोलीस स्टेशन हद्दितील बीएसजीएम शाळेच्या ग्राउंडवर रिकॉर्डवरील गुन्हेगार राजेंद्र विष्णु आधुडे हा समाजकंटक  तलवार घेऊन फिरत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. पोलीसांनी तात्काळ तेथे जाऊन तलवारसह त्या समाजकंटकाला अटक करुन त्याचे विरुद्ध फार्म साहेब प्रमाणे कारवाई केली. 

ही कारवाई पुंडलीकनगर पोलीस स्टेशनचे सपोनि घनश्याम सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रभाकर सोनावणे, रमेश सांगळे, बाळाराम चौरे, शिवाजी गायकवाड़, प्रवीण मुळे, रवी जाधव, कल्याण निकम यांनी केली.

Post a comment

0 Comments