सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सी.पी. जोशी यांचा प्रताप... ठेकेदारावरील देशद्रोहाचा गुन्हा रद्द करा...


निलेश जांबले
दौंड-

पुणे
महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघाच्या वतीने मागणी
आंदोलनास संभाजी ब्रिगेडचा पाठिंबा आहे

सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव सी.पी. जोशी यांनी 30 जून रोजी एक परिपत्रक जारी करून केवळ आणि केवळ ठेकेदारांना दोषी ठरवून शासनाचे काम खराब झाल्यास संबंधित ठेकेदारावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याबाबत नियम टाकलेला आहे. वास्तविक पाहता कामाचे अंदाजपत्रक मटेरियलचे टेस्ट रिपोर्ट कामावरती सुपर्विजन हे सर्व शासनाच्या माध्यमातून शासनाच्या एजन्सिज किंवा शासनाने नियुक्त केलेला इंजिनिअर करत असतो व सदर काम पूर्ण झाल्यानंतर काम पूर्णत्वाचा दाखला देऊन ठेकेदारास देयक अदा केले जाते. मग अशा सर्व परिस्थिती मध्ये काम खराब झाल्यास केवळ ठेकेदाराला दोषी धरणे हे कितपत योग्य आहे. काम चांगले झाले पाहिजे लोकांच्या पैशाचा  लोकांसाठी योग्य वापर झाला पाहिजे, ह्या मध्ये काही दुमत असण्याचे कारण नाही परंतु हे सगळं होत असताना केवळ ठेकेदाराला दोषी धरणे म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांना मोकाट सोडणे अशाच प्रकारचा हा मनोदय मा. जोशींचा असल्यामुळे त्यांनी हा जीआर काढला. त्याची *महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघा* च्या वतीने सर्व राज्यभर  निषेध करून ५ ऑगस्ट रोजी ह्या जीआर ची होळी अधीक्षक अभियंता कार्यालय पुणे येथे करण्यात आली. व सदर चा जीआर रद्द करण्यासाठी मा. मंत्री अशोक चव्हाण साहेब यांच्याशी पत्रव्यवहार संघटनेचे वतीने चालू आहे तो लवकरात लवकर रद्द करावा अशी ठेकेदारांची मागणी आहे. वास्तविक पाहता दीड ते दोन हजार कोटी रुपये शासकीय ठेकेदारांचे देणे शासन बाकी आहे परंतु याबाबत कोणतेही नियोजन न करता सर्वसामान्य ठेकेदारांना वेगवेगळे जीआर काढून त्याचे मुस्कटदाबी करून मोठ्या ठेकेदार किंवा स्वतःच्या एजन्सी या व्यवसायामध्ये आणून सर्वसामान्यांचे संसार उद्ध्वस्त करण्याचा घाट सी.पी. जोशी यांनी घातला आहे. व त्यामधून ठेकेदार अधिकारी यांच्यामध्ये प्रचंड दुही निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. या सर्व बाबींचा कंत्राटदार महासंघ पुणे च्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे. त्यावेळी श्री सुरेश कडू, विश्वासराव चोळकर, सागर ठाकर, शैलेश जी खैरे, निकम, श्री इंगळे, भूषण सोनवणे, शिवाजी राक्षे, प्रणव शिंदे आधी 40 ते 45 ठेकेदार उपस्थित होते.


Post a comment

0 Comments