कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेकडुन खरीप पिक विमा भरण्यासाठी मुदत वाढ देण्याची मागणी


फुलंब्री : योगेश तुपे

कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जयदीप ननावरे आणि कार्याध्यक्ष प्रविण भैय्या आजबे, मराठवाडा प्रदेशाध्यक्ष संकेत भैय्या गरड यांच्या निर्देशानुसार खरीप पिक विमा भरण्यासाठी मुदत वाढ देण्यात यावी.व फुलंब्री मार्केट कमिटी मक्का खरेदी केंद्रात जे 85 वाहन थांबले आहेत. त्या वाहनांचे लवकरात लवकर पंचनामे करून.मक्का खरेदी करावी यासाठी  जिल्हाध्यक्ष प्रनिल काळे  यांचा मार्गदर्शनात पदाधिकारी योगेश जाधव, शुभम साबळे, सुनील फुके, अजय ढेपले यांनी तहसिल कार्यालय, फुलंब्री येथे निवेदन दिले . 
जिल्ह्यातील कोरोना रोगाच्या संकटजन्य परिस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांचा पिक विमा नियोजित वेळेत भरला गेलेला नसून त्यासाठी मुदतवाढ आवश्यक आहे, त्यामुळे किमान पंधरा दिवसांची मुदतवाढ देण्यात यावी, जेणेकरून अनेक शेतकरी पिक विम्यापासुन वंचित राहणार नाहीत.  आजच्या घडीला शेतकरी संकटात सापडला आहे. त्यामुळे त्यांना दिलासा देण्यासाठी सरकार दरबारी यावर निर्णय व्हावा हीच अपेक्षा ही मागणी संघटनेने केली आहे.

Post a comment

0 Comments