नोबल पब्लिककेशनची काँपी केल्याप्रकरणी दोघा जणाविरुध्दात औरंगाबादेत गुन्हा दाखलपुस्तकांची खप घटल्याने प्रकरण आला उघडकीस


औरंगाबाद(प्रतिनिधी)/

नामवंत  नोबल पब्लिकेशन या प्रकाशन संस्थेच्या स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांची नक्कल करून त्यांची बनावट कॉपी प्रकाशित केल्या प्रकरणी औरंगाबाद शहरातील सातारा पोलीस ठाण्यात दोघा जणाविरुध्दात गुन्हा दाखल करण्यात आला.सदरचा प्रकार हा जून २०१८ ते जुलै २०२० या कालावधीत घडला. 


याबाबत पोलीस सूञांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,नोबल पब्लिकेशन्सचे प्रकाशक कारभारी,कौतिकराव भुतेकर हे स्वत एमपीएससीचे
क्लासेस चालवतात. सोबतच त्यांची स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांची प्रकाशन संस्था,२०१२पासून सुरू आहे. तसेच त्यांनी स्वतः स्पर्धा,परीक्षांच्या पुस्तकांचे लेखन केले आहे. या
संस्थेमार्फत ते स्पर्धा परीक्षेची पुस्तके प्रकाशन,करून विक्रीही करतात. यामध्ये नोबल मेगा सामान्य ज्ञान, पोलिस भरती प्रश्नपत्रिका संच आदींचा याता समावेश आहे.विद्यार्थ्यांना  स्पर्धात्मक पुस्तके सहज  उपलब्ध व्हावे या उद्देशाने त्यांनी या पुस्तकांचा काही भाग ते 'माझी नोकरी डॉट इन' या
पोर्टलवर, अँपवर तसेच 'मिशन खाकी,वर्दी' या व्हॉटस अँप ग्रुपवर देखील विक्री करण्यास सुरूवात केली.    त्यामुळे त्यांच्या विविध पुस्तके अल्पवधीत प्रसिध्दीच्या झोतात येऊन विद्यार्थ्यांचा विश्वासाला पाञ ठरत  २०१७ मध्ये प्रकाशित केलेल्या
या पुस्तकांची विक्री तब्बल  ७० लाखांच्या घरात गेली होती.तदनंतर हळूहळू  अचानक ही विक्री कमी होत चालल्याने भुतेकर यांनी या मागचा  शोध व कारण जाणून घेण्यात प्रयत्न केला असता त्यांना इंटरनेटवर २१६ नोबल मेगा भरती,प्रश्नपत्रिका ही दोनशे पेजेस पीडीएफ स्वरुपात,उपलब्ध असल्याची माहिती मिळाली. त्यांनी याबाबत  अधीक चौकशी केली असता ही प्रश्नपत्रिका
संशयित आरोपी तसेच 'माझी नोकरी डॉट इन',या पोर्टल व अँपचे डेव्हलपर्स हार्दीक सुतारी,(रा. डहाणू, जि. पालघर) तसेच 'मिशन-खाकी वर्दी' व्हॉटसअॅग्रुपचे अँडमीन यांनी,फसवणूक करीत प्रकाशित केल्याचे उघड झाले.याबाबत भुतेकर यांच्या तक्रारीवरून
दोघांविरुद्ध औरंगाबाद शहरातील सातारा पोलिस ठाण्यात फसवणूक
तसेच कॉपीराइट अँक्टनुसार गुन्हा दाखल,करण्यात आला आहे.या प्रकरणी पुढिल तपास सातारा पोलीस करत आहे.


नोबल पब्लिकेशन पुस्तकांची बाजारात वाढती मागणी

अगदी सोपी भाषा व भरोश्याची स्पर्धात्मक पुस्तके विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरल्याने  नोबल पब्लिकेशन प्रकाशनचे विविध पुस्तकांची बाजारात मागणी जास्त  प्रमाणात असल्याने ते कमी कालावधीत इतर प्रकाशन असलेल्या पुस्तकांच्या तुलनेत प्रसिध्दीच्या झोतात आहेत.

Post a comment

0 Comments