आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते हर्सूल तलावाचे जलपूजन

 -  औरंगाबाद

   औरंगाबाद शहराला साठी पाणीपुरवठा करणाऱ्या हर्सूल तलाव तयार होऊन ६६ वर्ष पूर्ण झाले आहे.दि.०५/०८/१९५४ त्याचे बांधकाम पूर्ण झालेले आहे व त्याचे लोकार्पण दि.०६/०७/१९५६मध्ये तत्कालीन चीफ मिनिस्टर  श्री. डॉ. बी. राममारिश्नराव.गोरमेंट ऑफ हैदराबाद सरकार यांच्या हस्ते झाले होते त्यावेळेस त्याला हैदराबाद सरकार कडून त्या तलावाचे काम पूर्ण करण्यासाठी ३०५६३७९ रू त्या काळातील खर्च झाले.या वर्षी खूप चांगल्या प्रकारे पाणी पडला आणि शेतकऱ्यांचे पिके सुद्धा खूप चांगली आहे ,आणि खूप पाणी पडल्यामुळे हा तलाव भरला आहे त्यामुळे हर्सूल शहरासाठी लागणाऱ्या पाण्याची आता  चिंता मिटली आहे.या तलावाचे जल पूजन आज  आमदार अंबादास दानवे यांच्या हस्ते करण्यात आले मागील चार वर्षांपासून तलाव मध्ये पाणी आले नव्हते मागील काही दिवसाच्या चांगला पाणी पडल्याने पावसाच्या पाण्याने तलाव पूर्ण भरला त्याचे आज पूजन करण्यात आले.

या कार्यक्रम वेळी श्री बाळासाहेब थोरात शिवसेना शहर प्रमुख ,  सौ प्रतिभाताई पाटील जगताप शिवसेना उप जिल्हा संघटक महिला आघाडी ,  श्री संजय भाऊ हरणे शिवसेना उप शहर प्रमुख, शिवसेनेचे  श्री रमेश भाऊ इधाटे, श्री रुपाचंद  वाघमारे मा नगरसेवक, मा श्री तुळशीराम भाऊ बकले शिवसेना पदधिकारी , मा श्री बन्शी मामा मा नगरसेवक , सौ संगीता कृष्णा बोरसे शिवसेना विभाग संघटक महिला आघाडी संभाजीनगर , कृष्णा बोरसे व सर्व  शिवसेना कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

Post a comment

0 Comments