बाप्पांची घरीच स्थापना करावी पोलिसांच्या या आवाहनास सिल्लोड शहरासह ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद
सिल्लोड - तालुक्यात यंदा गणपती बाप्पांचे आगमन साध्या पद्धतीने करण्यात आले. कोरोनाच्या संकटामुळे तालुक्यातील निम्या गणेश मंडळांनी सार्वजनिक गणपतीची स्थापना केली नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यंदा बाप्पांची घरीच स्थापना करावी असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले होते. या आवाहनाला शहरासह ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 

     दरवर्षी मोठ्या जल्लोषात साजरा होणारा गणेशोत्सव यंदा कोरोनामुळे साधे पणाने साजरा केला जात आहे.  गणेश मंडळांचे वेगवेगळ्या देखाव्यांमुळे गणेशोत्सवास एक वेगळेच स्वरूप प्राप्त होते. यंदा मात्र सर्वच सणांवर कोरोनाचे सावट आहे. यातुन सर्वांचे लाडके बाप्पा देखील सुटले नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक किरण बिडवे, उपनिरीक्षक विकास आडे, इंगळे व बीट जमादार तसेच अजिंठा ठाण्याचे किरण आहेर यांनी गावागावात जाऊन शांतता कमिटीच्या बैठका घेऊन साधे पणाने तसेच बाप्पांची घरीच स्थापना करावी असे आवाहन केले होते. या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून निम्याहुन अधिक सार्वजनिक गणेश मंडळांच्या सदस्यांनी यंदा गणपतीची स्थापना न करण्याचा निर्णय घेतला आहे. 

      शहरात गेल्या वर्षी 36 सार्वजनिक गणेश मंडळांनी परवानगी घेतली होती. यंदा मात्र 24 गणेश मंडळांनी परवानगी घेतलेली आहे. ग्रामीण पोलिस ठाण्यात 30 मंडळांनी परवानगी घेतली आहे. गेल्या वर्षी 74 मंडळांनी सार्वजनिक गणपती स्थापन केले होते. गणेशत्सव साजरा करतांना सोशल डिस्टन्स तसेच निर्गमित केलेल्या नियमांचे पालन करण्याच्या सुचना पोलिसांनी दिलेल्या आहेत. शिवाय गणेश विसर्जनाच्या दिवशी मिरवणुकीला परवानगी नसल्याने यंदा दरवर्षी प्रमाणे भक्तांमध्ये उत्साह दिसून येत नसल्याचे चित्र आहे. कोरोनामुळे यंदा गणेशत्सव साधे पणाने साजरा केला जात असल्याने देखावे, सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी नाही. यामुळे लहान मुलांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. गणेशत्सवच्या निमित्ताने देखावे, आर्केस्ट्रा, किर्तन, व्याख्यान, विविध स्पर्धा अशा कार्यक्रमांची रेलचेल राहते. यामुळे लहान मुले गणेशत्सवाची आतुरतेने वाट पाहतात. मात्र यंदा कोरोनामुळे लहान मुलांसह भक्तांच्या आनंदावर ही विरजन पडले आहे.


प्रतिक्रिया

     आरती किंवा पुजा करतांना शारीरिक अंतर तसेच प्रशासनाच्या नियमांचे पालन करावे. यंदा कोरोनाच्या पार्शवभूमीवर विसर्जन मिरवणुकीला परवानगी नसल्याने गणेश मुर्ती विसर्जनाच्या दिवशी नगर परिषद प्रशासन किंवा पोलीस प्रशासनाकडे सुपूर्द कराव्या. शहरात किंवा शहराबाहेरील तळ्यात तसेच इतर ठिकाणी गणेश विसर्जन करण्यासाठी जाऊ नये. गणेश भक्तांनी आपली व दुसऱ्यांची ही काळजी घ्यावी.

                               किरण  बिडवे 

                    पोलिस निरीक्षक, सिल्लोड    गामीण           

Post a comment

0 Comments