पुरामुळे झालेली पिक नुकसान भरपाई लवकर मिळाली नाही तर वैजापुरात रस्ता रोको मनसेचा इशारा


वैजापुर(प्रतिनिधी)/राहुल त्रिभुवन

मागिल वर्षी गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे झालेले नुकसान भरपाई मिळावे व यावर्षी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्यात यावे यासाठी मनसे तर्फे तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले.
सविस्तर असे की मागिल वर्षी गोदावरी ला पुर आल्यामुळे खूप साऱ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते तर कित्येकांचे संसार उध्वस्त झाले तरी सुद्धा अजून कोणालाही नुकसान भरपाई भेटलेली नाही तसेच यावर्षी पावसामुळे शेतकऱ्यांचे पिकाचे झालेले नुकसान याचा पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा मनसे स्टाइल ने लाडगाव चौफुली येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल अश्या इशाऱ्याचे निवेदन वैजापुर तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी यांनी तहसिलदार यांना दिले आहे.यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब घंगाळे, मनसे तालुका अध्यक्ष सुनिल गायकवाड,स्वप्नील श्रीवास्तव, राज शाबादे, गणेश बहाळस्कर, ऋषीं साळुंके आदी उपस्थित होते.

Post a comment

0 Comments