आडूळ वनाधिकारींनी घेतला बिबट्या मानव संघर्ष बाबत जनजागृतीपर कार्यक्रम


पैठण प्रतिनिधि.विजय खडसन:--- मौजे मुलानी वाडगाव जिल्हा परिषद शाळा येथे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी ग्रामस्थांना मनोज कांबळे , शीघ्र कृती दलाचे सदस्य तथा वन परिमंडळ अधिकारी आडुळ यांनी बिबट्या वन्य प्राणी विषयी ती भीती दूर करताना मार्गदर्शन केले की,
बिबट्या हा  मानवी वस्तीकडे येणे, शेतात लपून बसणे, गावातील शेळ्या, तसेच मेंढ्या/बकरीची शिकार करणे, धुमाकूळ घालणे असे अनेक प्रकार अलीकडच्या  काळात सातत्याने होत आहेत, तसेच बिबट्यांचा अधिवास नष्ट होणे यांसारख्या प्रकारांमुळे बिबट्यांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. यामुळेच बिबटे सैरभैर होताना दिसतात. याचा फटका थेट मानवी शेतीवस्तीत बसत आहे. ही बाब ओळखून वन्यजीव  अभ्यासक आदि गुडे यांनी तयार केलेली फिल्म, संकलीत माहिती पटाद्वारे एलसीडी प्रोजेक्टर, लॅपटॉप याद्वारे ही फिल्म दाखविण्यात  आली. त्याला ग्रामस्थांचा चांगला प्रतिसादही लाभला ,पुढे माहिती देताना आदि गुडे म्हणाले की, बिबट्यांचा वावर असलेल्या आणि बिबट्या-मानव संघर्ष निर्माण होणाऱ्या भागात जनजागृतीची ही मोहीम राबविणे अत्यावश्यक आहे.  सदर प्रकरणी वनकर्मचारी यांचेसह सरपंच सतीश शेळके,पोलीस पाटील रंगनाथ काळे  ,सुदाम शिरवत ज्ञानेश्वर उघडे ,कृष्णा मिसाळ शेषराव शिरवत, वाल्मीक दुबिले ग्रामस्थ यांचे सहकार्य लाभले.
 *बिबट्या आपल्या वस्तीकडे का येतो ? त्याला परावृत्त करण्यासाठी काय करावे ?* 
बिबट्या मानवी वस्तीकडे सहज खाद्याच्या शोधार्थ येतो. यामध्ये कुत्री-मांजरांपासून शेळ्या-मेढ्यांचा समावेश आहे. त्यामुळे बिबट्या आपल्या वस्तीकडे येण्यापासून मज्जाव करण्याकरिता ग्रामस्थांनी काही उपाययोजना आखणे आवश्यक आहेत. यामध्ये पाळीव प्राण्यांसाठी बंदिस्त गोठा किंवा पिंजरा तयार करावा. जेणेकरुन त्याला भक्ष सहजपणे मिळणार नाही. असे केल्यास बिबट्याला आपण केलेल्या या कृतीची जाणीव होते. त्याला खाद्य मिळणे बंद झाल्याने काही दिवसांमध्ये तो वस्तीकडे येणे बंद करतो.

Post a comment

0 Comments