वैजापूर येथील नारंगी मध्यम प्रकल्प येथे सुशोभितकरण करण्यात यावे - नगरसेवक स्वप्नील जेजुरकर


वैजापूर(प्रतिनिधी/राहुल त्रिभुवन) : 

वैजापूर येथील नारंगी मध्यम प्रकल्प येथे सुशोभितकरण  व करमणुकीचे  साधन निर्माण करणे बाबत नगरसेवक स्वप्निल जेजुरकर यांनी आमदार प्रा रमेश पा बोरणारे यांना निवेदन दिले आहे या निवेदनात  महिला व लहान मुलांना करमणूकीचे साधन निर्माण करण्यासाठी  नारंगी माध्यम प्रकल्पावर बाग बगीचे व फुलांचे व तसेच सुशोभित करण करुन  निसर्गरम्य वातावरण निर्माण करणे तसेच नारंगी मध्यम प्रकल्प येथे घाट तयार करून तेथे पेवर ब्लॉक बसून ती  सुशोभितकरने त्याच प्रमाणे नारंगी मध्यम प्रकल्पात नागरीकांना पर्यटनासाठी बोटिंग ची व्यवस्था करणे  तसेच शहरातील व तालुक्यातील हौशी  पर्यटक येथे येऊन या सगळ्यांना फायदा होईल या मुळे रिक्षा व छोटे मोठे  व्यापारी यांना उत्पनाचे साधन निर्माण होऊन मदत मिळेल व ही जागा औरंगाबाद नाशिक रोडवर असल्यामुळे शहरातील वैभवात भर पडेल तसेच वैजापूर येथील दशक्रिया विधीसाठी योग्य जागा विकसित करून वैजापूरच्या जनतेच्या अडचणी दूर होण्यास मदत होईल तरी वैजापूर शहराच्या विकासाला चालना देण्यासाठी ही  सदरील गोष्टींची या आवश्यकता आहे  असे मला वाटते आशा आशयाचे निवेदन  नगरसेवक स्वप्नील विष्णूभाऊ जेजुरकर यांनी दिले

Post a comment

0 Comments