जय भवानी विद्या मंदिर शेलगाव खुर्द येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार


 फुलंब्री (प्रतिनिधी गजानन इधाटे)

      फुलंब्री तालुक्यातील जय भवानी बहुद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ शेलगाव खुर्द संचलित, जय भवानी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्या मंदिर, शेलगाव खुर्द येथे इयत्ता १० वी व इयत्ता १२ वीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक सचिव दिगंबर ईधाटे होते. प्रमुख पाहुणे शेलगावचे सरपंच साहेबराव इधाटे, संचालक भगवंता इधाटे, प्राचार्य मधुकर पाटील हे होते.
     याप्रसंगी इयत्ता १० वीतील प्रथम-अक्षय बाजीराव तुपे (९०.८०%), द्वितीय-कु. सपना कौतिक तुपे (९०.४०%), तृतीय - सोनाजी आजीनाथ तुपे (८९.६०%), चतुर्थ - निखिल जनार्धन तुपे (८९.२०%), पाचवा अतुल सोमीनाथ फुके (८८.८०%), कु‌. शिवानी गजानन तायडे (८६.२०%), सागर बंडू तायडे (८३%), सागर अनिल तुपे (८७.४०%), गणेश दौलत इधाटे (८४.४०%), साईनाथ आजीनाथ इधाटे (८२.२०%), करण सुनील धनेधर (८५.२०%) तसेच इयत्ता १२ वीतील प्रथम - कु. सपल हरिदास इधाटे (७७.३८%), तृतीय - पुष्पा भगवंता इधाटे (७४.६१%), चतुर्थ - निवृत्ती भारत गाडेकर (७४%) या विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
      कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संस्थापक सचिव दिगंबर ईधाटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, जीवनात यशस्वी होण्यासाठी जिद्द, चिकाटी, मेहनत, कष्ट करण्याची वृत्ती आवश्यक आहे. आपण गुणवंत आहात मग ज्ञानवंत व्हा. देशसेवेचे व्रत हाती घ्या. आदर्श नागरिक होण्यासाठी प्रयत्नरत रहा.
     कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक काकडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार एकनाथ मेटे यांनी मानले.
     कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य मधुकर पाटील, दीपक काकडे, रामदास नावळे, प्रा. गजानन तायडे, मनोज सोनवणे, सुशील पवार, सुरेश इधाटे, गणेश तुपे यांनी पुढाकार घेतला.

Post a comment

0 Comments