गोरेगाव नगरीत श्रीकृष्ण जन्माष्टमी चा सोहळा भक्तिमय वातावरणात आणि विशेष नियमाचे पालन करीत साजरा

रायगड, माणगाव
आज गोरेगाव नगरीत श्रीकृष्ण जन्माष्टमी चा सोहळा भक्तिमय वातावरणात आणि विशेष नियमाचे पालन करीत साजरा करण्यात आला
१९५५ साला पासून अविरत चालु असलेला हा जन्माष्टमी चा सोहळा आज या सोहळ्याला ६५ वर्ष पूर्ण झाली त्याच उत्साहात त्याच भक्तिभावाने आज देखील जन्माष्टमी उत्सव साजरा करण्यात आला विशेष म्हणजे या कॉरोनाचा संकटात नियमाचे पालन करीत, मर्यादित लोकांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न झाला 
रात्री ठीक १२.३० चा सुमारास श्रीकृष्ण जन्म च्या वेळी मंदिराच्या मध्य भागी असलेली श्रीकृष्णाची मूर्ती  वर फुल अर्पण करुन हा सोहळा साजरा करण्यात आला, 
तसेच जमलेल्या गावकऱ्यांनी लवकर जगा वर आलेला कोरोना संकट संपुष्टात येऊदे आणि सर्वसामान्य जनतेचे जनजीवन सुरळीत चालू होऊदे अशी प्रार्थना श्रीकृष्ण चरणी केली.
प्रतिनिधी, रिजवान मुकादम सह मराठा तेज, गोरेगाव ,रायगड

Post a comment

0 Comments