सचिन ढोले यांना सर्वोत्कृष्ट उपजिल्हाधिकारी पुरस्कार घोषितपंढरपूर : पंढरपूर येथील प्रांताधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सचिन ढोले यांना जिल्हा प्रशासनाच्या वतीने "सर्वोत्कृष्ट   उपजिल्हाधिकारी" हा पुरस्कार नुकताच घोषित करण्यात आला. 

भारतीय स्वातंत्र्यदिन तसेच महसूल दिन यानिमित्ताने जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पुरस्कारांची घोषणा नुकतीच झाली. यामध्ये सचिन ढोले यांना सर्वोत्कृष्ट उपजिल्हाधिकारी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. 

प्रांताधिकारी सचिन ढोले गेल्या अडीच वर्षापासून पंढरपूर मध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यकाळात उत्कृष्ट महसूल प्रशासन तसेच पंढरपूरच्या वारीचे योग्य नियोजन महापूर तसेच कोरोनासारख्या आपत्तीच्या काळात देखील त्यांनी केलेले चांगले नियोजन. तसेच लवकरात लवकर पूर्णत्वाकडे नेलेले भूसंपादनाची प्रक्रिया. या सर्व बाबींचा विचार करूनच जिल्हा प्रशासनाकडून त्यांना सर्वोत्कृष्ट उपजिल्हाधिकारी हा पुरस्कार घोषित करण्यात आला आहे.

Post a comment

0 Comments