पैठणमध्ये रोगप्रतिकारशक्ती वर्धक काढा तिन दिवस वाटप
पैठण / प्रतिनिधी.विजय खडसन

जमात ए ईस्लामी संघटनेच्या माध्यमातून मालेगांव येथे कोरोनावर केलेल्या प्रयोगाचा काढा तिन दिवसापासून वाटप करण्यात आला असून शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी सामाजिक दायीत्व म्हणून हा काढा मोफत देण्यात आला .यावेळी पोनि भगिरथ देशमुख ,डॉ पंडित किल्लारीकर, पैठणचे नगरसेवक हसनोदीन कटयारे, आदींची प्रमुख उपस्थिती होती 
सद्यस्थितीत कोरोना या साथीच्या रोगाने थैमान घातले असून रोज शहरासह तालूक्यातील कोरोना बाधीत रूग्णाच्या  संख्येत  चिंताजनक वाढ होत आहे .त्यातच मालेगांव येथे सुरूवातीला कोरोना साथीच्या रोगाने थैमान घातला होता मात्र तेथील लोकप्रतीनिधी व प्रशासनाने शुध्द आयुर्वेदीक काढा बाधित रूग्ण व सामान्य नागरिकाला हा काढा दिल्याने मालेगाव पुर्णत: कोरोना मुक्त झाले आहे .त्याच धर्तीवर जमात ए ईस्लामी हिंद या संघटनेने सामाजिक दायीत्व म्हणून पैठण शहरासह तालुक्यात या काढ्याच मोफत वाटप करून तालुका कोरोना मुक्त करण्याचा निर्धार केला असून ह्या उपक्रमास संघटनेचे जवाबदार मोहम्मद हानिफ , अँड इम्रान शेख ,जाकेर कटयारे ,जाकेर आंबेकर व सर्व पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले

Post a comment

0 Comments