गोरेगाव शहरात नियोजनशुन्य बँकिंग व्यवस्था. सामाजिक कार्यकर्त्यांकडून निवेदन सादर

रायगड,गोरेगाव 
    गणेशोस्तव तोंडावर येऊन ठेपलेला असताना गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने बंद असणाऱ्या ATM सुविधांच्या प्रश्नावर गोरेगावातील सामाजिक क्षेञातील होतकरू व जबाबदार अशा काही सुजान तरूणांनी पुढाकार घेत संबंधित बँकेच्या व्यवस्थापकांना निवेदन देत चांगलाच जाब विचारला आहे.
          गोरेगाव मधील बँक आॅफ इंडीया या बँकेचे ATM मशिन हे गेल्या अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असल्याने येणाऱ्या सणाच्या काळात खरेदीसाठी आवश्वक असणारा पैसा गोरगरीब जनतेला प्रत्यक्ष बँकेत जाऊन काढावा लागत आहे. त्यातच निसर्ग चक्रीवादळ मध्ये नुकसान झाल्याने खात्यात जमा झालेले पैसे काढण्यासाठी देखील लोकांची प्रचंड गर्दी बँकेबाहेर होताना दिसत आहे.  माञ बँकेचे अधिकारी कडून होणाऱ्या  गर्दीबाबत काहीही नियोजन नसल्यामुळे कोरोना च्या काळात असणाऱ्या नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. ह्याला चाप बसवण्याची जबाबदारी गोरेगावातील तरुण व धाडसी सामाजिक कार्यकर्ते अॅड राजेश लिमजे, जयेंद्र मुंढे, उमेश लाड, राहुल बामणोलकर व अन्य काही लोकांनी स्विकारत आज दि. १८/८/२०२० रोजी सदर ATM मशिन सुरळीत चालु करण्याचे व सातत्याने सुरु राहील याची दक्षता घेण्याचे आवाहन बँक अधिकारी यांना केले आहे. 
       बँकेच्या बाहेर जमा होणाऱ्या गर्दीमुळे वादांचे प्रमाणही वाढत आहेत. भयानक गर्दी मुळे कोरोना चा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता देखील नकारता येणार नाही, तसेच शहरातील अन्य बँकांना म्हणजेच भारतीय स्टेट बँक व आय.डी. बी. आय बँक यांना देखील ATM, मशिन सुरळीत चालू ठेवण्याचे निवेदन देण्यात आलेले आहेत. अशी सर्व प्रतिक्रिया अॅड लिमजे यांनी समाजमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली.
प्रतिनिधी रिजवान मुकादम  मराठा तेज गोरेगाव रायगड.

Post a comment

0 Comments