वरंध घाटात रस्त्याची संरक्षण भिंत कोसळली संरक्षण भिंतीचा मोठ्ठा भाग कोसळल्याने वाहतुक बंद


रायगड -    रायगड आणि पुण्याला जोडणाऱ्या महाड भोर मार्गावरील वरंध घाटात रस्त्याच्या दगडी संरक्षण भिंतीचा मोठ्ठा भाग कोसळला.  यामुळे येथील वाहतुक बंद करण्यात आली आहे.  महाड औद्योगिक वसाहत पोलिस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असुन JCB च्या सहाय्याने हि दरड काढण्याचे काम सुरु आहे.
       गतवर्षी वरंध घाटात अशाच प्रकारे अतीवृष्टीदरम्यान रस्त्याचा मोठ्ठा भाग वाहुन गेला होता.  वर्षभरासाठी हा घाट रस्ता बंद करण्यात आला होता.  त्यानंतर पुन्हा या वर्षी देखिल घाट रस्त्याची संरक्षण कोसळल्याने घाटा रस्ता वाहतुकीसाठी किती सुरक्षित आहे याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.
प्रतिनिधी सुरेश शिंदे सह मराठा तेज रायगड

Post a comment

0 Comments