झुडपात दडलेले शिवलिंग , देवदरीतील सावळेश्वर देवस्थान.
 फुलंब्री( प्रतिनिधी गजानन इधाटे)

श्रावण मासातील ' सोमवारी ' शिवपुजनाचे महत्व असून अनेक भावीक परिसरातील विविध तिर्थ स्थळावर दर्शनासाठी जात असतात . असेच एक तिर्थक्षेत्र फुलंब्री तालुक्यातील औरंगाबाद -जालना जिल्ह्याच्या सिमेवर मारसावळी शिवारात एका झाडा झुडपातील  दरीत शिवतिर्थ असून त्यास देवदरीतील सावळेश्वर असे म्हणतात . हे शिवलिंग अनेक भाविक भक्तांचे श्रध्दास्थान आहे .
  फुलंब्री तालुक्यातील पिरबावडा गावापासून दक्षिणेस ८ ते १० कि मी अंतरावर एका डोंगरदरीत आहे . येथे हेमांडपंती दगडी पुरातन महादेव मंदीर आहे . पुरातन दगडी मंदीराचे काम हे हजारो वर्षापूर्वी स्थापित दगडी मंदीराची निर्मीती जुनी असली तरी या शिवालयाचा जिर्णोध्दार अलिकडील काळातील  असून खोल दरीत कोसळणार धबधबा कुंडातील थंड व स्वच्छ पाणी व मंदीरापर्यंत जाई पर्यंत न दिसणार मंदीर हे वैशिष्ठ आहे . पुर्वी येथे वन्य , जंगली प्राण्याचा वास होता . स्वातंत्र्यापूर्वी अनेक सेनानी येथे झुडपात वास्तव्य केले आहे. जुना इतिहास ह्या परिसरास असून सर्वत्र कडक दुष्काळ असतांना सन १९७२ च्या दुष्काळात वन्यजिव , वन्य पशु - पक्षी या ठिकाणी झुळझुळणाऱ्या झऱ्यावर तहान भागवून जात . त्या काळात मारसावळीकरांसह इतर गावातील नागरिकांसाठी हा झरा ( कुंड ) जलसंजिवनी ठरला होता . पुढे हा कुंड भाविकांच्या अस्तेचा केंद्रबिंदु ठरला . या ठिकाणी अंघोळ करून ओल्या वस्त्राने शिव पिंडीला अभिषेक केल्यास भोळा शंकर पावतो व सर्व मनोकामना पुर्ण होतात अशी धारणा होते .  सन २००३  नंतर परिसरातील भाविक भक्तांच्या लोक वर्गणीतुन व आलेल्या देणगीतुन अनेक विकास कामे करत परिसरात अनेक सुविधा निर्माण करत भक्तासाठीच्या सोयी करण्यात आल्या . आता येथे भोजन कक्ष , भांडार गृह , पाणी व्यवस्था , प्रांगणात फेवर ब्लॉक बसविण्यात आले आहे . या परिसरातील भक्त मंडळी सह गावकऱ्यांच्या सहमतीने येथे मंदीर गाव समिती निर्माण असून सन २०१२ _ १३ पासून बाबुराव धुपाजी गाडेकर हे अध्यक्ष होते
 . २o१६  या काळात येथे मंदीर परिसरात सरासरी १ हजार स्कॉयर फुटाचे स्लॅपचे सभागृह बांधण्यात आले असून यात भांडे ठेवण्यासाठी  ,  किराणा किंवा महत्वाचे सामान सह सभागृह आदि सुविधा आहे . कोणताही शासकीय निधी , फंड  न मिळवता  , लोकवर्गणी व दानपेटीतुन आलेल्या निधीचा वापर करून अनेक विकास कामे करण्यात आले आहे  .वन्य प्राणी किंवा दगड मंदीर परिसरात येऊ नये म्हणून डोंगर बाजुने मंदीरांच्या दक्षिण _ पाश्चिम बाजुस लोखंडी जाळी लावण्यात आली आहे . येथे नोंदणी कृत ट्रस्ट नसून लोकवर्गणीतुन गाव समिती अनेक विकास कामे करत असून खोल नाल्याकडून सिमेंटी संरक्षक भिंत , डोंगरकडा भागात दगडी संरक्षक भिंत , मंदीरासमोर भक्कम आर सी सी सभा मंडप हे काम अपेक्षीत व संकल्पीत आहे . भविष्यात लहान मुलांसाठी अध्यात्म शाळा , रुग्णसेवेसाठी रुग्णवाहिकेसह विविध सेवा देण्याचा मानस आहे असे मत विद्यमान अध्यक्ष काशिनाथ शेकुबा गाडेकर यांनी  बोलताना सांगितले.
  इतर वेळेस श्रावण सोमवारी सरासरी १० हजार भाविक हजेरी लावत सरासरी २५ हजारापेक्षा जास्त देणगी जमा होत . श्रावण महिन्यात १ ते दिड लाख भाविक येथे भेट देत असत तर ७o ते ८o हजार रूपये देणगी जमा होत असत परंतु आता कोरोना मुळे मंदीर बंद आहे . त्यामुळे भक्ता सह देणगीचा झरा आटत आहे . असे हे देवदरीतील भक्तांचे श्रध्दास्थान कोरोना संकटात सापडले आहे हे विशेष.

Post a comment

0 Comments