अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या श्री राम मंदिर भूमीपूजनाप्रीत्यर्थ अन्वी येथे " प्रसाद"वाटप ---अभिनव प्रतिष्ठानने व्यक्त केला आंनद

           अन्वी- येथील अभिनव् प्रतिष्ठानच्या सदस्यांनी काल दि.5 ऑगस्ट बुधवार रोजी अयोध्या येथील श्रीराम मंदिर भूमीपूजन महोत्सवाचे औचित्य म्हणून गावात महादेव मंदिरात साखर -खोबरे या प्रसादाचे गावकऱ्यांना वितरण करण्यात आले.गावोगावी हा दिवस प्रभू श्रीरामचंद्र यांच्या मंदिर निर्मिताचा भूमीपूजन दिन म्हणून साजरा केला गेला.कोरोनासाथी मुळे इच्छा असुनही अनेकांना या " याची देही" सोहळ्यास आपणास जाता आले नाही अशी खंत अन्वी येथिल श्री राम भक्तांनी व्यक्त केली मात्र घरी राहून हा आनंद प्रसाद वाटप करून द्विगुणित झाला.सोसियल डिस्टनसिंग चे पालन करत भाविकांनी प्रसाद ग्रहण केला.या वेळी वयस्क व्यक्तींनी गतकाळातील कारसेवेच्या आठवणींना उजाळा दिला.सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे शिवानंद चापे,जगदीश चापे, विजय गायकवाड, शंकर नाकीरे,आबा पारवे,अक्षय चापे,आकाश भवर,ऋषिकेश पाटील, मयूर पाटील,उमेश तमखाने,अभिषेक वराडे, नाना पारवे यांनीं परिश्रम घेतले.

Post a comment

0 Comments