खंडाळा येथील पाणीपुरवठा करणारी मेन पाईप लाईन फोडुन घेतले कनेक्शन.ग्रामपंचायते केली अज्ञात व्यक्ती विरोधात पोलीसात तक्रार


वैजापुर(प्रतिनिधी)/राहुल त्रिभुवन

खंडाळा गावासाठी पाणीपुरवठा करणारी मेन पाईप लाईन फोडुन वाल बसवुन कनेक्शन घेतल्याचा प्रकार खंडाळा येथे घडला असून  खंडाळा गावकरी यांनी आवाज उठवल्यानं  ग्रामपंचायत ने पंचनामा करुण अज्ञात व्यक्ती विरोधात पोलीसात तक्रार दाखल केली आहे.

सविस्तर माहीत अशी की ,
वैजापूर तालुक्यातील खंडाळा येथील गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी कोल्ही प्रकल्पातुन भारत निर्माण योजनेंतर्गत काम करुण ९ इंच पाईप लाईन द्वारे खंडाळा गावासाठी पाणी आणण्यात आलेले असुन सदर खंडाळा जवळील  पुला शेजारी गावासाठी पाणीपुरवठा करणाऱ्या मेन पाईप लाईन मधुन कोणीतरी अज्ञात व्यक्तीने ९ इंच पाईप लाईन ला वाल बसवुन कनेक्शन घेतल्याचे दिसून आल्याने एकच खळबळ उडाली. त्यामुळे ग्रामपंचायत ने पंचनामा करुण अज्ञात व्यक्ती विरोधात वैजापूर पोलीस ठाण्यात तक्रार करुण चौकशी करण्याची मागणी केली आहे.
एखाद्या अज्ञात व्यक्तीने कोणालाही थांगपत्ता न लागता मेन पाईप लाईन फोडुन एका रात्रीत कनेक्शन जोडल्या जात असेल तर याला जबाबदार कोण असा ही प्रश्न नागरीकांत उपस्थित होत आहेत.तो पर्यंत ग्रामपंचायतला याची खरच कानोकान खबर नव्हती का? का मुद्दामहून कानाडोळा करण्यात आला होता का? कोणालाही  असे एक ना अनेक प्रश्न नागरीकांत चर्चेत आहेत.
 ग्रामपंचायत ने पंचनामा केला खरा परंतु नागरीकांनी मेन पाईप लाईन फोडल्याची तक्रार अर्ज ग्रामपंचायतला दिला, तेव्हा कुठे ग्रामपंचायतने जागी होऊन पंचनामा करण्यासाठी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला.त्यानंतर पोलीस ठाणे वैजापुर या ठिकाणी तक्रार दाखल केली असून बिट जमादार मोईस बेग यांनी अज्ञात व्यक्तिविरोधात तपास सुरू केला आहे.


-

Post a comment

0 Comments