मराठवाड्यात खोडेगांव ग्रामपंचायत राज्यमंत्री बच्चु कडुंनी घेतली दत्तक.. वैजापूर(प्रतिनिधी/राहुल त्रिभुवन) :


राज्यमंत्री नामदार बच्चू भाऊ कडु यांनी वैजापूर ता.प्रमुख ज्ञानेश्वर घोडके यांनी केलेल्या शिफारशी वरुण मौजे  खोडेगाव ग्रामपंचायत दत्तक घेतले प्रहारचे अमोल ढगे व प्रमोद गायकवाड यांनी अनेक विकास कामांचा पाठपुरावा करत खोडेगाव मध्ये लाईट,पाणी, रस्ते,रुक्षारोपण,प्रहारच्या प्रयत्नातून विकास कामांना यश मिळाले आहे..
प्रामाणीक कार्यकर्त्यांची धडपड बघुन राज्यमंत्री बच्चु कडु यांनी
मराठवाड्यातील पहिल्यांदाच औरंगाबाद तालुक्यातील मौजे खोडेगाव दत्तक घेतले. खोडेगांव मध्ये गोरगरीबांचे सर्व प्रश्न सोडून सर्व विकास कामे करण्याचे आश्वासन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले. यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व प्रहार कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळाली आहे.या निर्णयाने मौजे खोडेगावातील ग्रामस्थ अतिशय आनंदी झाले ,खोडेगाव पुर्ण विकासमय होतंय ..या वेळी गणेश सावंत,सागर गुंड,बाळु सावंत,प्रहार विद्यार्थी संघटना जिल्हा अध्यक्ष कृष्णा गाडेकर,बळीराम ब्राम्हणे (गोधळी), संदीप विर,औरंगाबाद उपतालूकाध्यक्ष हरीभाऊ जाधव ईतर प्रहार पदाधिकारी उपस्थित होते.

Post a comment

0 Comments