मित्रांनीच केला सराईत गुन्हेगार मित्राचा कोयत्याने खून ; सातजण अटकेतभोसरी,पुणे – जिगरी मित्रांनीच सराईत गुन्हेगार मित्राचा खून केला. दारू पिताना झालेल्या किरकोळ वादातून शनिवारी (दि.८) रात्री दिघी रोडवर हा प्रकार घडला आहे. भोसरी पोलिसांनी सात आरोपींना अटक केली आहे.

मयूर मडके (वय २६, रा. मरकळ रोड, आळंदी) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगारचे नाव आहे. मडके याच्यावर दिघी, आळंदी, भोसरी आणि विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत मयूर आणि आरोपी हे एकमेकांचे जिगरी मित्र आहेत. शनिवारी रात्री मयूर आणि त्याचे दोन आरोपी मित्र दिघी रोडवर दारू प्यायला बसले. त्यानंतर आणखी काही मित्र दारू पिऊन तिथे आले. किरकोळ कारणांवरून त्यांच्यामध्ये वाद झाला. या वादातून आरोपींनी मयूर याच्यावर कोयत्याने वार केले. यात गंभीर जखमी झालेल्या मयूरचा मृत्यू झाला.

भोसरी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. 

याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Post a comment

0 Comments