भर पावसात आमदार भरतशेठ गोगावले यांनी केली आज वरंध घाटाची पाहणी

 

प्रतिनिधी सुरेश शिंदे रायगड

वरंध घाटातील अवघड वळणावरील काही भाग कोसळला आहे,त्या मुळे अवजड वाहने बंद करण्यात आली आहेत,छोटी वाहतूक सुरू आहे, 
आज सकाळी आमदार भरतशेठ गोगावले, तसेच नॅशनल हायवे चे अधिकारी आणि महाड बांधकाम खात्याचे आधीकारि यांना सोबत घेऊन आमदार साहेबांनी भर पावसात भिजत रस्त्याची पाहणी केली
या वेळी उपस्थित संपर्क प्रमुख विजय सावंत,तालुका प्रमुख सुरेश महाडिक,सुभाष मालुसरे, अनिल मालुसरे आणि इतर शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते, 
या वेळी आमदार भरतशेट गोगावळे यांनी  संबंधित अधिकाऱ्यांना सांगितले की छोटी आणि हलकी वाहने सुरूच राहतील अशी उपाय योजना करा आणि कोसळलेल्या संरक्षक भिंतीच्या कामाला पाऊस कमी झाल्या बरोबर सुरुवात होईल अशी शासन दरबारी तयारी करा असे आदेश गोगावले यांनी दिले.
तसेच  हा रस्ता कशामुळे खचला केबल टाकल्यामुळे खचला असेल तर त्याची चौकशी करून ज्या ज्या कंपनीने केबल टाकण्यासाठी रस्त्याचे खोदकाम केले होते त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली.

Post a comment

0 Comments