हर्सूल तलावात शिवसेनेच्या वतीने शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते जलपूजन, १४ वर्षानंतर तलाव तृप्त


औरंगाबाद, दि. ३  -  अर्ध्या शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या हर्सूल तलाव १००% भरला आहे. वरुणराजाच्या कृपेने सर्वत्र पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला असून शहरवासीयांची चिंता मिटली आहे. १९५४ साली झालेल्या या प्रकल्पामुळे शहरासह परिसरात चांगला फायदा झाला. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने हर्सूल तलावाचे ब्रम्हवृदांच्या उपस्थितीत  विधिवत पूजन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे व आमदार प्रदीप जैस्वाल यांच्याहस्ते करण्यात आले.
युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख नारायण सुरे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी महापौर नंदकुमार घोडेले, युवासेना उपसचिव  उपमहापौर राजेंद्र जंजाळ, शहरप्रमुख बाळासाहेब थोरात,महिला आघाडी उपजिल्हासंघटक   प्रतिभा जगताप, नगरसेवक बन्सीमामा जाधव, किशोर नागरे, रुपचंद वाघमारे, माजी नगरसेवक रविकांत गवळी, उपशहरप्रमुख संजय हरणे, काशिनाथ बकले, गणेश सुरे, मच्छीन्द्र हरणे, रमेश सूर्यवंशी, युवासेना उपशहरप्रमुख नागेश थोरात, रविराज क्षीरसागर, चंद्रकांत सुरे, अक्षय पाथरीकर, भारत पचलोरे, कार्तिक सुरे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.

Post a comment

0 Comments