प्रहार संघटनेचा रास्ता रोको आंदोल नाचा इशारा

औरंगाबाद -

 बिल्डा ते आळंद ह्या फुलंब्री तालुका हद्दीतील औरंगाबाद ते जळगाव राष्ट्रीय महामार्ग पॅकेज -1-क्र.एन-एच 753 -एफ ह्या रस्त्याचे कामासाठी मे.  प्रोजेक्ट्स प्रा.लि. हैद्राबाद आणि मे. आर. के. इन्फास्टक्चर (ई) प्रा.लि. पुणे यांनी अनाधिकृतपणे मुरुम उत्खनन व वाहतुक केलेली असल्याचे तहसील कार्यालयाचे  निदर्शनास आलेले आहे. तसेच सदर कंपन्यांनी मंजूर परवानगी पेक्षा जास्त गौनखनिज वापरल्याचेही या कार्यालयास दिसुन आले आहे. त्यामुळे ह्या प्रकरणात या कार्यालयाचे प्रत्यक्ष जागेची स्थळपाहणी करुन संदर्भ क्र. (1) वर नमुद आदेशानुसार वरील कंपन्यांना 43,56,18,232 /-(अक्षरी रुपये त्रेचाळीस कोटी छप्पन्न लाख अठरा हजार दोनशे बत्तीस रुपये फक्त) ईतक्या रुपयांची वसुली करण्याचे आदेश या तहसील कार्यालयाने पारीत केलेले आहेत. सदर आदेश संबंधित कंपनीस रीतसर तामील देखील करण्यात आलेले आहेत. तरी वरील कंपनीने दि.2/06/2020 रोजी. रु 1,23,63,005 /- (अक्षरी रुपये एक कोटी तेवीस लाख त्रेसष्ट हजार पाच फक्त) तहसील कार्यालयास भरणा केलेला आहे.  उर्वरित रक्कम रु.42,32,55,227 ( अक्षरी बेचाळीस कोटी बत्तीस लाख पंचावन्न हजार दोनशे सत्तावीस फक्त)  अद्यापही सदरील कंपनीने तहसील कार्यालयास भरणा केलीली नाही तरी सदर कंपन्यांनी दंडाची रक्कम तात्काळ तहसील कार्यालयास भरणा करण्यात यावी अन्यथा प्रहार संघटना औरंगाबाद जळगाव मार्गावर पाल फाटा येथे दि.7/08/2020 रोजी रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल याची सर्वस्व जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग विभागाची असेल याची आपण नोंद घ्यावी असा इशारा देण्यात आला आहे

.

Post a comment

0 Comments