वैजापूर(प्रतिनिधी/राहुल त्रिभुवन):
सोमवारी पोलीस स्टेशन वैजापूर येथे गणेश उत्सव सोहळा व गोकुळाष्टमी यानिमित्ताने सरपंच,तंटामुक्ती अध्यक्ष, गणेश मंडळाचे अध्यक्ष व गोकुळ अष्टमी निमित्ताने दहीहंडी चे अध्यक्ष व श्री ची मूर्ती वीकणारे डीजे डॉल्बी बँड वाले यांच्या वेगवेगळ्या सकाळ व दुपारच्या सत्रात मेरोथॉन बैठकीचे आयोजन आज दिवसभरात पोलीस स्टेशन वैजापूर येथे करण्यात आले होते. सदर बैठकीदरम्यान उपविभागीय पोलिस अधिकारी गोपाल रांजणकर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. संबंधित बैठकित तहसीलदार निखिल धुळधर,पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी,
मुख्य अधिकारी बिघोत, यांनीसुद्धा सविस्तर मार्गदर्शन करून कोरोना संसर्ग दरम्यान शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन नागरिकांनी करावे तसेच शासनाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे सण साजरे करावे व गणेशोत्सव दरम्यान गणेशाची मूर्ती चार फुटांच्या वरती नसावी व घरातील मूर्ती दोन फुटाच्या वरती नसावी याबाबत व इतर नियमाबाबत सविस्तर मार्गदर्शन यावेळी केले . बैठकीदरम्यान आभार प्रदर्शन गोपनीय शाखेचे पोलीस नाईक संजय घुगे यांनी मानले तसेच बैठकी दरम्यान covid-19 च्या संसर्ग संसर्गाच्या नियम व अटी म्हणजेच सोशल डिस्टनसिंग,मास्क या बाबतचे काटेकोरपणे बैठकीदरम्यान पालन करण्यात आले.
0 Comments