फुलंब्री (प्रतिनिधी गजानन इधाटे)
फुलंब्री तालुक्यातील वडोद वाडी येथे भारतीय जनता पार्टीचे जिल्हाअध्यक्ष तथा संभाजीनगर जिल्हाचें माजी उपमहापौर विजय औताडे यांनी वडोद वाडी या ठिकाणी जाऊन सोमेश्वर महाराज यांच्या समाधी चे दर्शन घेऊन त्या ठिकाणी असलेले अशोकगिरी महाराज व भक्त परिवार याच्याशी चर्चा केली.
तसेच तालुक्यातील वडोद बाजार येथील काही शेतकऱ्यांशी सवांद साधला व शेतकऱ्यांच्या असलेल्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला या वेळी शेतकरी याची अडचणी मध्ये त्या ठिकाणी असलेली बँक शेतकऱ्यांना नाहक त्रास देत आहे,कर्जमाफी साठी विचार पूस केली तर बँक कर्मचारी माहिती देत नाही,मक्का खरेदी केंद्र बँद झाल्याने शेतकऱ्याच्या मक्का पूर्ण पणे उगवून आल्या तरी लवकरात लवकर मक्का खरेदी केंद्र सुरू करणे,दुधाचा भाव शेतकऱ्यांना वाढवून देणे,सध्या सुरू आसलेले रोहित्र ची खूप दैनि अवस्था झालेली आहे तरी त्यांची दुरुस्ती करण्यात यावी. सदरील शेतकऱ्यांच्या अडचणीसाठी विजय भाऊ औताडे यांनी सदरील आधिकारी याना फोन करून कल्पना दिली व लवकरात लवकर कामे मार्गी लागतील असे शेतकऱ्यांना सांगून वडोद बाजार येथे या असलेली बँक ऑफ महाराष्ट्र या बँकेत जाऊन तेथील बँक मॅनेजर व बाकी कर्मचारी याच्या शी संपर्क साधून बँकेत आलेल्या शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन देण्यात यावे तसेच पीक कर्जाचे वाटप करून नाहक होत असलेल्या शेतकऱ्यांचा त्रास थांबवण्यात यावा असे बँक कर्मचारी यांनी सांगण्यात आले. बँक अधिकारी सर्वसामान्य जनतेची होत असणारी पिळवणूक थांबवावी, असे बँक अधीकारांना जाब विचारुन सध्या कोरोनाच्या परस्थितीमध्ये या गोष्टी शक्य नसतानी तुम्ही सर्वसामान्य जनतेला त्रास देऊ नये व येथेच त्यांचा प्रश्न मार्गी लावावा ही विनंती केली यावेळी बँक अधिकारी यांनी यानंतर अस होणार नाही असे आश्वासन दिले यावेळी भाजपाचे गोपाळ वाघ,दौलत वाघ,संतोष शिनगारे, रामेश्वर वाघ , रेशमजी शिनगारे,कडूबा म्हस्के,आजीनाथ वाघ,नितीन सदावर्ते, पंडित जाधव,संतोष म्हके ,राहुल वाघ, योगेश काथार,प्रकाश बिलगे आदी पदाधिकारी व गावकरी उपस्थित होते
0 Comments