पावसाळा, कोरोनाचा प्रादुर्भाव आणि सणवार एकत्र आल्याने अधिक काळजी घेण्याची गरज - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


                             पुणेदि.२३ -, कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी सुविधांची उभारणी राज्यभर सुरु असून पावसाळाकोरोनाचा प्रादुर्भाव आणि सणवार एकत्र आल्याने अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांनी आज व्यक्त केले. संपूर्ण गणेशोत्सव काळात गर्दी होणार नाहीकोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी,  असे आवाहन करतानाच गाफील न राहता आतापर्यंत आपण जी काळजी घेतो आहोत तीच पुढेही घ्यावीअसे आवाहनही मुख्यमंत्री ठाकरे यांनी केले. सोबतच पुणेकरांना निरोगी आरोग्य लाभू देअशी प्रार्थनाही त्यांनी केली.  

            शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या (सीओईपी) परिसरात कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी  उभारण्यात आलेल्या  कोविड रुग्णालयाचे मुख्यमंत्री उद्धव  ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण झाले यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार कार्यक्रमस्थळी उपस्थित होते. कार्यक्रमास महापौर मुरलीधर मोहोळआ.सुनिल कांबळेआ. सिद्धार्थ शिरोळेपुणे महानगरपालिका स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासनेविभागीय आयुक्त सौरभ रावपोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशमपुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसेजिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुखपुणे मनपा आयुक्त विक्रम कुमारपिंपरी-चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकरअतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवालदीपाली डिझाईन्‍सचे व्‍यवस्‍थापकीय संचालक विनय मित्तल उपस्थित होते. खा. सुप्रिया सुळेखा. श्रीरंग बारणेआमदार डॉ. नीलम गो-हेआ. चंद्रकांत पाटीलआ. माधुरी मिसाळ आदी मान्यवर या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झाले होते.

          कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.  कोरोनामुळे सर्वधर्मियांनी आतापर्यंतचे सगळे सण साधेपणाने घरातच साजरे करून शासनाला सहकार्य केल्याबद्दल त्‍यांनी सर्वांचे आभार मानले. ते  म्हणालेपुणे शहरातील गणेशोत्सव पाहण्यासाठी परदेशातून नागरिक येत असतातश्री गणेशाची प्रतिष्ठापना आपण दरवर्षीप्रमाणे यंदाही केली आहेमात्र यावेळेस आपल्यासमोर कोरोनाचे विघ्न आहे. या विघ्नातून लवकरात लवकर मुक्ती मिळावी तसेच सामाजिक भान ठेऊन शांततेत यंदाचा गणेशोत्सव आपण साजरा करूयाअशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री ठाकरे यांनी संपूर्ण गणेशोत्सव काळात गर्दी होणार नाहीकोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही याची प्रत्येकाने काळजी घ्यावी असे आवाहन करतानाच कोणीही गाफील न राहता आतापर्यंत आपण जी काळजी घेतो आहोत,  तीच पुढेही घेणे आवश्यक आहे तसेच मास्कचा नियमित वापर करावावारंवार हात धुणेवैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता तसेच सुरक्षित अंतर यावर भर देणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

            मुख्यमंत्री श्री.  ठाकरे म्हणालेपुणे येथे कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्सासाठी जम्बो रुग्णालयाची अत्यंत कमी कालावधीत उभारणी केलीही उल्लेखनीय बाब आहे. पुण्यातील या कोविड रुग्णालयामध्ये अद्ययावत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेतकोरोनाची एक लाट ओसरल्यानंतर दुसरी लाट येते हा जगभरातील अनुभव आहेत्यावरून आपण गाफील राहून चालणार नाहीत्यासाठीच अधिकच्या सुविधांची उभारणी करण्यात येत असल्याचे सांगून पुणेकरांना निरोगी आरोग्य लाभू देअशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. लॉकडाऊन नंतर आपण काही गोष्टींमध्ये शिथिलता दिली. दैनंदिन व्यवहार सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्रयामुळे गाफील राहून चालणार नाही. कायम सतर्क राहावे लागणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काटेकोर नियोजन करुन आणि नागरिकांनी नियमांचे पालन करावेअसे आवाहनही त्यांनी केले.

          उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार म्हणालेनागरिकांना आरोग्याच्या दर्जेदार सुविधा देणे ही शासनाची प्राथमिकता आहेत्यामुळेच पुण्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत जम्बो रुग्णालयांची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. पाऊस सुरू असताना अत्यंत कमी कालावधीत या कोविड रुग्णालयाची उभारणी केली आहे. या रुग्णालयामुळे कोविड रुग्णाला वेळेत उपचार मिळणे सुलभ होणार असून पुणेपिंपरी चिंचवड तसेच ग्रामीण भागातील रुग्णाला या सुविधेमुळे दिलासा मिळणार आहे. या रुग्‍णालयात मंगळवार सायंकाळपासून रुगणसेवा देण्‍यास सुरुवात होईलअसेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. गणेशोत्‍सवाचा उल्‍लेख करुन उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांनी कोरोना संसर्गाबाबतची दक्षता घेत सुरक्षित गणेशोत्सव साजरा करावाअसे आवाहन केले.

            महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी जम्बो रुग्णालय निश्चित उपयुक्त ठरेलअसा विश्वास व्यक्त केला.

                    विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणालेपुणे जिल्हयातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या विचारात घेत जम्बो रुग्णालयाची उभारणी करण्यात आली आहे. जम्बो सुविधेमुळे बेड उपलब्‍धता वाढणार असून कोरोनाबाधित रुग्णाला वेळेत उपचार मिळण्यास मदत होणार आहे. यावेळी त्‍यांनी पुणे जिल्ह्यातील कोरोना विषयक परिस्थिती आणि त्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.

कार्यक्रमात जम्बो कोविड रूग्णालयाची उभारणीवर आधारित चित्रफीत दाखविण्यात आली. आभार सुहास दिवसे यांनी मानले.

Post a comment

0 Comments