पैठण तालुक्यातील मुलानी वाडगाव येथे बिबट्याचा वावर पंधरवड्यात दोन पाळीव जनावरे फस्त, शीघ्र कृती दलाने घेतला आढावा


पैठण प्रतिनिधी.विजय खडसन:--  पैठण तालुक्यातील मुलानी वडगाव शेतशिवारांमध्ये बिबट्याचा वावर वाढत असल्याने शेतकरी वर्गात दहशत निर्माण झालेली होती. परंतु  सदरची माहिती  प्राप्त होताच  प्रसंगावधान राखत  वनपरिक्षेत्र  औरंगाबाद  प्रा. येथील  वनाधिकारी वन कर्मचारी  यांनी शीघ्र कृती दल सह तात्काळ  घटनास्थळी पाचारण केले. याबाबत अधिक वृत्त असे की , दिनांक 8 ऑगस्ट 2020  रोजी  सकाळी मुलानी वडगाव  येथील शेतकरी कृष्णा शिरवत यांच्या मालकी शेतात  हिंस्त्र वन्य प्राण्याच्या हल्ल्यात बकरी ठार झाली असून बिबट्याचे भीतीने गावकरी भयभीत असल्याची वार्ता मिळताच तात्काळ  अरुण पाटील सहाय्यक वनसंरक्षक औरंगाबाद प्रा, सचिन शिंदे सहाय्यक वनसंरक्षक कन्नड तथा शीघ्र कृती दल प्रमुख  यांचे मार्गदर्शनाखाली  एस. बी.  तांबे,वनपरिक्षेत्र अधिकारी  औरंगाबाद प्रा.,मनोज कांबळे 
वनपरिमंडळ अधिकारी तथा शीघ्र कृती दल सदस्य  यांचेसह  या दलाचे सदस्य  वनरक्षक विश्वास साळवे, राजेंद्र जाधव  व  आदि गुडे  वन्यजीव अभ्यासक ,वन्यजीव प्रेमी श्रीकांत  वाहुळ यांच्या  चमूने बिबट्याच्या पायाचे ठसे जागोजागी मागोवा घेत आजूबाजूच्या संपूर्ण परिसर फिरस्ती करीत असताना साधारणत: एक किलोमीटर अंतरावर बिबट्याचे पंजाचे स्पष्ट ठसे प्लास्टर ऑफ पॅरिस ने घेतले. *__तद्नंतर सदरचा हिंस्र वन्यप्राणी बिबटच असल्याचे निष्पन्न झाले.__* 
शीघ्र कृती दलाचे जवान यांनी बिबटयाचे पगमार्क चा अभ्यास करून  तो नेमक्या कोणत्या मार्गाने येतो आणि कुठे जातो याचा शोध घेऊन  कॅमेरा ट्रॅप, 2 डिजिटल कॅमेरे  लावण्यात आले आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी शक्य त्या सर्वच उपायाचा अवलंब वनविभाग करीत आहे.

Post a comment

0 Comments