प्रा. अरुण कांबळे बनपुरीकर लिखित *माझे मातीतले पाय* या ग्रामीण कविता संग्रहाचे प्रकाशन


 पंढरपूर / गणेश गांडुळे : 
                  प्रा. अरुण कांबळे बनपुरीकर  लिखित व समीक्षा पब्लिकेशन पंढरपूर प्रकाशित *माझे मातीतले पाय* या ग्रामीण कविता संग्रहाचे प्रकाशन १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजता सातारच्या साहित्यिका सौ. अंजली गोडसे यांच्या शुभहस्ते व उषा शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्रा. सविता दूधभाते यांच्या अध्यक्षतेखाली झूम अ‍ॅप  व्दारे ऑनलाइन पद्धतीने संपन्न होणार आहे अशी माहिती समीक्षा पब्लिकेशन चे प्रकाशक प्रविण अनिलराव भाकरे व पुस्तकाचे लेखक प्रा. अरुण कांबळे बनपुरीकर यांनी दिली. 
या कार्यक्रमा मध्ये सांगलीचे जेष्ठ साहित्यिक दयासागर बन्ने यांचे मार्गदर्शन लाभणार आहे, या. कार्यक्रमासाठी समीक्षा पब्लिकेशनचे संपादक सौ. संध्या काळे, ज्ञानेश्वर विजागत, राजू उराडे, गुरुदेव जगदाळे, अयाज बागवान, रोहित दिवटे, ऋषि कवडे, मोहासिन मुजावर, सौ.विद्या कांबळे उपस्थित राहणार आहेत.

Post a comment

0 Comments