फुलंब्री मध्ये भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश


 *फुलंब्री (प्रतिनिधी गजानन इधाटे)* 

फुलंब्री तालुक्यातील काही कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी  भवन येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मा आ कैलास पाटील  यांच्या  हस्ते फुलंब्री तालुक्यातील भाजपाचे कार्यकर्तांचा प्रवेश  जिल्हा उपाध्यक्ष  नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली व तालुकाध्यक्ष राहुल डकले ,युवक तालुकाध्यक्ष विजय मोरे,सोशियल मिडिया तालुकाध्यक्ष गणेश सोनवणे यांच्या  उपस्थितीत करण्यात आला .यावेळी  मा सभापती तथा चेअरमन शिरोडी सिध्देश्र्वर भागवत,पिंपळगाव गागंदेव चे मा उपसरपंच भाऊसाहेब काकडे,टाळकी कोलते चे मा सरपंच पुडलिंकराव कोलते,बाबरा येथील जगन्नाथ पवार,पानवाडी येथील मा ग्रामपंचायत सदस्य मुसा पटेल यांचा राष्ट्रवादी मध्ये जाहिर  प्रवेश करण्यात आला. यावेळी सुखदेव खरात,सुखदेव जिवरग आदि उपस्थित होते..

Post a comment

0 Comments