भारतीय जैन संघटनेच्या वतीने प्लाज्मा दात्यांची यादी शासनाकडे सुपूर्द करण्याचा संकल्प


वैजापुर(प्रतिनिधी)/राहुल त्रिभुवन

कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व ग्रामीण भागातही दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या चार महिन्यात भारतीय जैन संघटना (बीजेएस) ला कोरोना संदर्भात महाराष्ट्रातील गावागावात वेगवेगळे समाज कार्य करण्याची संधी मिळाली आहे. या सर्व अनुभवावरून असे दिसते कि कोरोनापेक्षा कोरोनाची भीती लोकांना जास्त त्रासदायक ठरत आहे. वास्तविक पाहता कोरोना झाल्यावर आपण त्यातून बाहेर येऊ शकतो , यावर लोकांचा विश्वास बसणे जरुरी आहे. *कोरोनावर मात करून बरे होऊन आलेल्या व्यक्तीचा प्लाज्मा कोरोनाबाधित रुग्णाला दिल्यामुळे त्याला जीवनदान मिळू शकते* व त्यातून आपण यशस्वीपणे बाहेर येऊ शकतो ही भावना लोकांच्यामध्ये निर्माण होणे आवश्यक आहे. 
सध्या केंद्र व वेगवेगळ्या राज्य शासनातर्फे कोरोनाच्या संदर्भात प्लाज्मा थेरपीवरती गेल्या अनेक महिन्यांपासून संशोधन सुरु आहे.
*कोरोना बाधितांवर विनाविलंब ईलाज होऊन त्यांना जीवनदान मिळावे* या करता बीजेएसने संपूर्ण महाराष्ट्रात *बीजेएस प्लाज्मा डोनर्स जीवनदाता योजना* च्या माध्यमाने चळवळ उभी केली आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बीजेएसच्या कार्यकर्त्यांचे नेटवर्क आहे. त्यामुळे प्लाज्मा दान करण्यास पात्र असणाऱ्या ५००० व्यक्तींना प्रोत्साहित करून त्यांचे संमतीपत्र मिळवून शासनाला सुपूर्द करण्याचा निर्णय बीजेएसने घेतला आहे. यासाठी किमान १७ वर्षे पूर्ण किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या व्यक्ती , कोरोना आजारातून बरे होऊन दोन आठवड्यांपेक्षा जास्त अवधी झाला आहे आणि इतर कोणतेही गंभीर आजार नसलेल्या व्यक्तीच प्लाज्मा देण्यासाठी पात्र आहेत. बीजेएसच्या वतीने सर्व कोरोना योद्ध्यांना आवाहन करण्यात येते की आपण आपला प्लाज्मा दान करून एक पुण्याचे काम करावे. असे आवाहन भारतीय जैन संघटने चे मराठवाडा विभाग सचिव निलेश पारख , तहसीलदार निखिल धुळधर साहेब , हेमंत संचेती , राजेश संचेती , विशाल संचेती , राजेंद्र पारख , प्रफुल संचेती , प्रकाशचंद बोथरा , अशोक कोठारी , गौतमचंद संचेती , नंदलाल मुगदिया , दिपक सारडा , संजय मालपाणी , महेश हिरण , डाॅ.मोहित बोरा , डाॅ.संतोष गंगवाल , डाॅ.पंकज संचेती , संतोष लोढा यांनी केले आहे.

Post a comment

0 Comments