कोरोना कामकाजातुन शिक्षकांना कार्यमुक्त करा प्रहार शिक्षक संघटनेची मागणी


 पैठण प्रतिनिधी.विजय खडसन:—  महाराष्र्ट शासन परिपञक दि.17 आॅगस्ट 2020 च्या सदर्भांन्वचे शिक्षकांना आॅनलाईन शिक्षणासाठी कोंविड .19 च्या कामातुन कार्यमुक्त करण्या संदर्भाच्या पञानुसार पैठण तालुक्यातील शिक्षकांना कोंविड 19च्या कामातुन कार्यमुक्त करण्यात यावे अशासंदर्भाचे निवेदन दि. 20 आॅगस्ट 2020 रोजी महाराष्र्ट राज्य प्रहार शिक्षक संघटना जिल्हा प्रसिध्दी प्रमुख .अशोक पवार यांच्या नेतुत्वाखाली प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रविण वाघमोडे सर यांच्या वतीने पैठणचे तहशिलदार चंद्रकांत शेळके यांना देण्यात आले तहशिलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की सध्या राज्यात कोंरोना महामारीचे संकट सावरल्याने या रोगावर मात करण्यासाठी शासन स्तरावरून अनेक उपाययोजना राबविण्यात येत आहेत त्या अनुषंगाने कोंविड 19 च्या प्रादुर्भावामुळे संपर्कसुची तयार करण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे माञ शासन निर्णय 17 आॅगस्ट 2020 रोजीच्या परिपञका नुसार शिक्षकांना आॅनलाईन शिक्षणासाठी पाचारण करण्यात आलेले असुन या पञकान्वचे शिक्षकांना कोंविड 19 च्या कामासाठी नियुक्ती केली आहे .ती नियुक्ती नियमबाह्य आहे त्यामुळे आॅनलाईन शिक्षणासाठी कोंविड 19 च्या कामावरुन तातडीने कार्यमुक्त करण्यात यावे.अशी मागणी प्रहार शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष. प्रविण  वाघमोडे यांच्या वतीने तहशिलदार चंद्रकांत शेळके यांना निवेदन देण्यात आले यावेळी प्रविण दादा वाघमोडे ,अशोक पवार (जि.प्रसिध्दी प्रमुख) दिपक बोरूडे सर. श्री,दुष्यंत बंर्डे.श्री.प्रदिप अंधारे सर,श्री,सुहास शिंदे सर. श्री.भागवतं बडे सर श्री.आगाशे सर. श्री.संदिप गोर्डे सर, श्री,अमर वावरे सर .श्री.आदी उपस्थित होते

Post a comment

0 Comments