डॉ कवडे यांच्या वाढदिवसानिमित्त एम.आय.टी. येथे वृक्षारोपण


वैजापूर(प्रतिनिधी/राहुल त्रिभुवन):

एम.आय.टी. पॉलिटेक्निक रोटेगाव येथील संस्थेच्या परिसरात नुकतेच वृक्षारोपन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ.वाय.ए.कवडे  यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे संस्थेचे प्राचार्य प्रा.किशोर एस.पाटील यांनी याप्रसंगी सांगितले. 
निसर्ग आणि मनुष्य यांचे अतूट नाते असून निसर्गाच्या सानिध्यातच मानवाचा  विकास होऊ शकतो, यावर डॉ. कवडे  यांचा ठाम विश्वास असल्याचेही त्यांनी याप्रसंगी सांगितले. 
या माध्यमातूनच निसर्गाशी समतोल साधान्याचा आमचा हा एक छोटासा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

या प्रसंगी प्रशासकीय अधिकारी प्रा.व्ही.जी.तळेकर,
संस्थेतील सिव्हिल, कंप्युटर, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेली-कम्युनिकेशन आणि मेकॅनिकल इंजिनीअरिंग शाखांचे विभाग प्रमुख प्रा.एस.एन.पाठक, प्रा.ए.एस.सरदार, प्रा.व्ही.एम.जाधव व प्रा.जी.ए.भिसे तसेच सर्व प्राध्यापक व कर्मचारी वृंद उपस्थित होते. संस्थेच्या आतील व बाहेरील बाजूस निलगिरी, अशोक आणि गुलमोहर या वृक्षांची लागवड करण्यात आली.
याबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा.डॉ.वाय. ए.कवडे , महासंचालक प्रा. मुनिषजी शर्मा, संचालक प्रा. शकुंतला लोमटे मॅडम, संचालक प्रा.बिजली देशमुख, संचालक प्रा.भुपेशजी मिश्रा व संचालक प्रा.शितल देशमुख यांनी संस्थेत राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल प्राचार्य, सर्व प्राध्यापक व कर्मचारी वर्ग आदींचे अभिनंदन केले आहे.

Post a comment

0 Comments