बालविवाह प्रकरणी पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल

भोसरी, पुणे - एका अल्पवयीन मुलीशी बालविवाह केल्याबाबत पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा प्रकार तिरुपती चौक, इंद्रायणीनगर, भोसरी येथे घडला. याबाबत १३ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरज सुखलाल काळे (वय १९, लांडगेवस्ती, भोसरी) असे बालविवाह करणा-या पतीचे नाव आहे. त्याच्यासह आशिष हकीकत भोसले (वय ३०), कारली आशिष भोसले (वय ३५, दोघे रा. शांतीनगर, भोसरी), तीरला सुखलाल काळे (वय ४०), सुखलाल मोतीलाल काळे (वय ५०, दोघे रा. लांडगेवस्ती, भोसरी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून नियोजित वधूचे वय १८ वर्षांपेक्षा कमी आहे हे माहिती असताना तिचा आरोपी सुरज याच्याशी विवाह लावला.

आरोपींनी बालविवाहास प्रोत्साहन देऊन विवाह घडवून आणला. याबाबत भोसरी पोलीस ठाण्यात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम 2006 चे कलम 9, 10, 11 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Post a comment

0 Comments