वैजापूर शिऊर रोडवर अपघात चालकाचा ताबा सुटल्या मुळे घडला अपघात एकाचा मृत्यू


वैजापूर (प्रतिनिधी)/राहुल त्रिभुवन

  वैजापूर शिऊर रोडवर जरुळ फाटा शनिवार दि १ रोजी रात्री ९:३० वाजेच्या सुमारास नाना ढाब्याजवळ ईरटीका कार पलटी होऊन अपघात घडला या अपघातात १९ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला 
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार असे की शिऊरहून वैजापूरकडे येत असताना  जरुळ फाटा जवळील नाना ढाबा जवळ इरटीका कारच्या  चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला   
या कारमध्ये पाच तरुण हे जखमी झाले या घटनेची माहिती मिळताच वैजापूर पोलीस ठाण्याचे बीट अंमलदार मोईस बेग यांनी व सहकार्याने घटनास्थळी धाव घेऊन जखमीना ताबडतोब उपचारसाठी वैजापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले 
समीर संतोष जाधव वय १९ वर्षे रा दुर्गानगर वैजापूर प्रवीण बबन बरबडे वय २३ वर्षे, नितीन बबन बरबडे वय २५ वर्षे, शुभम प्रविण निंबाळकर वय २३ वर्षे व
एकाचे नाव माहीत नाही
 हे सर्व रा नवजिवन काॅलनी वैजापूर यांना उपचारासाठी वैजापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता समीर संतोष जाधव गंभीर जखमी असल्याने उपचार करून औरंगाबादला उपचारासाठी जात असताना  रस्त्यात मृत्यू झाला 
चौघांवर वैजापूर येथे उपचार सुरू आहेत व  समीर संतोष जाधव वय १९ वर्षे यांचा उपचार दरम्यान मृत्यू  झाला.

Post a comment

0 Comments