येत्या आठ दिवसात श्रावण बाळ,संजय गांधी निराधार योजनेचे पगार तात्काळ देण्यात यावे

...

 
वैजापूर(प्रतिनिधी)/राहुल त्रिभुवन

गेल्या सहा महिन्यांपासून श्रावण बाळ योजना, संजय गांधी योजनांचे पगार केलेले नाही सध्या राज्यात जि परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे गरीब दुर्बल लोक हतबल झाले आहेत, तरी येत्या ८ दिवसात पगार वाटप करावे व ज्या नवीन फाईल प्रकरण दाखल झालेले आहेत त्या मंजूर करुन त्यांना पण पगार चालु करून द्यावा नसता येत्या दि १४ ऑगस्ट पासून आमरण उपोषण करण्यात येईल व पुढील सर्व प्रकरणास आपण व आपले प्रशासन जबाबदार राहील याची नोंद  घ्यावी अशा आशयाचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले आहे या निवेदनावर बहुजन समाज पार्टीचे बाबासाहेब पगारे यांची स्वाक्षरी आहे.वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार वंचित बहुजन आघाडी तालुका वैजापूरच्या वतीने वैद्यकीय पदवीधर व पदयुत्तर स्तरातील अभ्यासक्रमा मध्ये प्रवेश प्रक्रियेमध्ये २७% आरक्षण ठेवण्यात यावे या मागणीसाठी  वैजापूर येथे तहसिलदार निखिल धुळधर यांच्याकडे वंचित बहुजन आघाडी तालुका वैजापूरच्या वतीने लक्ष्मण धनेश्वर यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देताना वंचित बहुजन आघाडी तालुका वैजापूरचे ता.का.सदस्य यशवंत पडवळ मनोज बापु पठारे,संजय बागुल,नामदेवराव त्रिभुवन, बापु.धनेश्वर,अमोल दिवे,संजय उत्तम बागुल,बंडू मोरे इ

Post a comment

0 Comments