रोहित्री भ्रष्टाचार व काटेरी झुडूप बोगस बिले काढल्या प्रकरणीत्वरित चौकशी करा - आडसुळपैठण प्रतिनिधी.विजय खडसन:- पैठण येथील उपविभागीय अभियंता महावितरण उपविभाग अंतर्गत येत असलेल्या ठिकाणी कमी दाबाचा विज पुरवठा होत असल्याने विज वितरण कंपनी च्या माध्यमातून अनेक ठिकाणी रोहित्र बसविण्यात आले असुन यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असुन रोहित्री भ्रष्टाचार व काटेरी झुडूप  याची बोगस बिले काढल्या प्रकरणी.
याबाबत निवेदन देऊनही अद्यापही चौकशी करण्यात आली नसल्याने भारतीय रिपब्लिकन पार्टी(आठवले गटाचे) जिल्हा उपाध्याय सुनील आडसुळ यांनी दि. 15 ऑगस्ट रोजी महावितरण कार्यालय पैठण समोर कार्यालयीन वेळेत अमरण उपोषण करण्या
बाबत दि.10 ऑगस्ट 2020 रोजी पैठण येथील उपविभागीय अभियंता महावितरण उपविभाग यांना निवेदन देण्यात आले आहे.
आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील आडसुळ यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,रिपब्लिकन पक्षाच्या वतीने अनेक वेळा लेखी तक्रारी करून हि कोणत्याही प्रकारची भष्टाचारा ची चौकशी होत नाही संबंधित महावितरण अधिकारी हे संबंधित गुतेदार याना पाठीशी घालत आहेत चौकशी करण्यासाठी पहिले निवेदन दि .11 / 06 / 2020 दुसरे निवेदन दि .21 / 07 / 2020 तिसरे निवेदन दि 03/08/2020 रोजी उपोषण करण्याचे होते परंतु काही तांत्रिक कारणास्तव रद्द केले , विषेश बाब म्हणजे टिव्ही चॅनेल व अनेक सुप्रसिद्ध दैनिक मध्ये हया रोहित्री कुपन घोटाळा . काटेरी झुडूप न तोडता तसेच अनेक ठिकाणी रोहित्री कुपन केले नाही या सर्व कामाचे बोगस बिले काढल्या बाबत काहीच कार्यवाही झालेली नाही करीता.जर 15 ऑगष्टच्या आत संबंधित गुतेदार व दोषी अधिकारी याच्या वर कडक शासन न केल्यास आपल्या कार्यालया समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा भारतीय रिपब्लिकन पार्टी(आठवले गटाचे) जिल्हा उपाध्याय सुनील आडसुळ यांनी उपविभागीय अभियंता महावितरण उपविभाग पैठण यांना निवेदन देण्यात आले आहे

Post a comment

0 Comments