प्रा. विजय बर्फे यांना पी.एच. डी. पदवी प्रदान


        पैठण प्रतिनिधी.विजय खडसन:--   पैठण तालुक्यातील म्हारोळा येथील विजय उत्तमराव बर्फे यांना पी.एच. डी. पदवी प्रदान करण्यात आली. सध्या ते सातपुडा  शिक्षण प्रसारक मंडळाच्या वसंतराव नाईक कला, विज्ञान व वाणिज्य  महाविद्यालयातील शहादा जी. नंदुरबार येथे  ग्रंथपाल या पदावर कार्यरत आहे.
      *राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ,  नागपूर येथे ग्रंथालय व माहिती  शास्त्र विद्याशाखेत डॉ. दिपक कापडे यांच्या मार्गदर्शनाखाली "उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयीन शिक्षकांची प्रकाशन उत्पादन गती एक सायंटोमेट्रिक अध्ययन " या विषयात संशोधन केले आहे.  नागपूर विद्यापीठाच्या वतीने  ऑनलाईन व्हायवा घेण्यात आला होता, सदर विद्यापीठाचे कुलगुरू व कुलसचिव यांनी त्यांना पीएचडी पदवी प्रदान केल्याचे जाहीर करण्यात आले आहे.*
        *प्रा. डॉ. विजय बर्फे यांचे सातपुडा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष नानासाहेब जाधव , सोनामाई शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा सौ. आशाताई जाधव ,सचिव अॅड. सुधीर जाधव , विभागीय सचिव प्रा.संजय जाधव , उपाध्यक्ष सौ. प्रतिमा जाधव ,सचिव सौ. वर्षा जाधव ,समन्वयक संजय राजपूत , प्राचार्य डॉ. ए.एन. पाटील , प्र.प्राचार्य डॉ भारत चालसे,  तसेच सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर  कर्मचारी यांनी  त्यांचे अभिनंदन व कौतुक केले आहे.*

Post a comment

0 Comments