रांझणी गावात सापडला पहिला कोरोना बाधित रूग्ण


पंढरपूर - तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आता ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाढ होतेय.आता पर्यत तालुक्यातील तब्बल ४२ गावात कोरोना पाँझिटिव्ह रूग्ण सापडले आहेत. कोरोना रूग्णाची वाढती संख्या पाहता पंढरपूर शहरात ७ दिवस लाँकडाऊन करण्यात आले आहे.मात्र ग्रामीण भागात लोकांमध्ये सतर्कता दिसून येत नाही.गेल्या काही दिवसात रांझणीच्या शेजारील शिरगाव,नेपतगाव,ओझेवाडी ,सरकोली,मुंढेवाडी,गोपाळपूर या भागात कोरोना पाँझिटिव्ह रूग्णात लक्षणीय वाढ झाली आहे.त्यामुळे रांझणी ग्रामस्थांनी  सतर्कतेने राहणे गरजेचे होते.मात्र ग्रामसमितीच्या निष्काळजी पणामुळे ग्रामस्थांनी नियमांना मात्र केराची टोपलीच दाखली.विना मास्क फिरणे, टोळके करणे,सोशल डिल्टशनचा फज्जा उडवत कोरोना विषयी अकलेचे तारे तोडत कोरोना आमत्रंण दिलेच.

रांझणी गावात सापडलेले रूग्ण हा पेशाने हाँटेल व्यावसायिक असून इतर व्यसायामुळे शहरात जाणे तसेत प्रशासकीय अधिकारी वर्गात वावर असल्याचे समजते.रूग्णाची हिस्ट्री काढून संबंधितांची चाचणी करण्यात येणार आहे.

पाँझिटिव्ह व्यक्ती व्यवसायिक असल्याने गावातील लोक मोठ्या प्रमाणात संपर्कात आले असल्याती शक्याता आहे.तरी ज्यांनी ताप,सर्दी,खोकला अशाप्रकारे प्राथमिक लक्षणे दिसून येत आहेत. त्यांनी स्वता:हून समोर येऊन कोरोना टेस्ट करून घ्यावी आणि आपल्या परिवाराची तसेच गावाची काळजी दूर करावी.विनाकारण फिरणार्या अफवावर विश्वास ठेवू नये.सबंधीत परिसरात कोरोनाची प्राथमिक लक्षणे असलेला रूग्ण आढल्यास ग्रामसमितीला संर्पक करावा.असे कळविण्यात आले आहे

Post a comment

0 Comments