शेलगाव खुर्द येथे उपविभागीय कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांची भेट


 फुलंब्री( प्रतिनिधी गजानन इधाटे)फुलंब्री तालुक्यातील शेलगाव खुर्द येथील प्रगतशील शेतकरी बालाजी दामोधर तुपे यांनी याच्या शेतामध्ये मागच्या वर्षी जून 2019 मध्ये आद्रक पिकाची लागवड केली होती.पण आद्रक या पिकाला योग्य भाव न मिळाल्याने त्यांनी  आद्रक न विकता तशीच ठेवली आज ती आद्रक 14 महिन्याची पूर्ण झालेली आहे आणि त्यांनी त्याच्या आद्रक पिकाला काही रासायनिक तर काही जैविक या पद्धतीने पिकाला खताचे व्यवस्थापन त्यांनी केले त्याच्या शेतामध्ये त्यांनी शेत तलाव करून जीवमूत साठी 40 हजाराची टाकी विकत घेऊन त्यांनी आद्रक पिकाला जीवमूत सोडले बाकी रासायनिक खतांचा खर्च कमी केला.आज सर्व जण रासायनिक खताच्या व औषध याचा भडिमार करून पिकाचे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे,त्यावेळी उत्पन्न तर होते पण खर्च ही खूप होतो,याच धर्तीवर शेलगाव येथील प्रगतशील शेतकरी बालाजी तुपे यांनी खर्च कमी व्हावा यासाठी माळवी गाय विकत घेऊन त्या गाईच्या शेणापासून व गोमित्रा पासून त्यांनी जीवामूत तयार करून आद्रक पिकाला देऊन अश्या प्रकारे शेती फुलवली,आज त्याच्या आद्रक पिकाची उंची किमान 4 ते 5 फुटांपर्यंत आहे.त्यांचे गावातील आद्रक पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना नेहमी मार्गदर्शन असते.व ते  शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पिकावर कोणता रोग आहे यावर कुठलं औषध फवारावे याची माहिती ते संपूर्ण आद्रक,कपाशी पिकाच्या शेतकऱ्यांना देत असते.

 *प्रगतशील शेतकरी बालाजी तुपे प्रतिक्रिया* 
आद्रक पिकाचे उत्पन्न काढण्यासाठी व कमी खर्च करायचा असल्यास शेतकऱ्यांनी जीवमूत चा प्रयोग नक्की करावा 1 एकर शेतीसाठी किमान 1000 ते 1500 लिटर जीवमूत आद्रक पिकाला द्यावे जेणे करून उत्पन्न वाढेल व खर्च ही कमी होईल.आज मी माझ्या शेतात जि खोडवा आद्रक ठेवलेली आहे ते  आद्रक क्षेत्र  22 गुंठे आहे त्या मध्ये कमीत कमी 160 ते 175 किंटल आद्रक निघू शकते आणि हे सर्व जीवमूत मुळे शक्य झाले आहे,जीवमूत ने जमिनीतील कर्ब वाढते व जमिनीतील कर्ब वाढल्याने जमीन बलवान बनते,कारण मी 1 महिना जैविक व 1 महिना रासायनिक करतो.


त्याच्या शेततातील आद्रक पीक पाहण्यासाठी जिल्हाभरातून आद्रक शेती वाले, कंपनी वाले अश्या वेगवेगळ्या नागरिकांनी आद्रक बघण्यासाठी हजेरी लावली,आसेच आज फुलंब्री येथील उपविभागीय कृषी अधिकारी अनिलकुमार हादगावकर तालुका कृषी अधिकारी सुभाष आघाव व काकासाहेब इंगळे मंडळ कृषी अधिकारी शिवाजी गिरी,तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा)मकरंद ननावरे,सहहयक तंत्रज्ञान व्यवस्थापन जगदीश जाधव कृषी सहहयक अंकुश कांबळे,कृषी पर्यवेक्षक राधकीसन  मानकापे व नामदेव जिंदे व प्रगतशील शेतकरी यांचे वडील दामोदर तुपे ,श्रीराम इधाटे आदी उपस्थित होते.

Post a comment

0 Comments