प्रकाश खोपकर यांना जिल्हा राजिप कर्मचार्‍यांकडून निरोप


अलिबाग ( प्रतिनिधी) :रायगड जिल्हा परिषदेचे सामन्या प्रशासन विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर यांची धुळे जिल्हा परिषदेच्या  ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली आहे. त्यांना शुक्रवारी (दि. 7) जिल्हा परिषद कर्मचारी संघटना व अधिकारी यांच्यातर्फे निरोप देण्यात आला.
          रायगड जिल्हा परिषदेच्या  स्व. प्रभाकर पाटील सभागृहामध्ये निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता.  जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष योगिता पारधी, रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील , अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित सोमवंशी,  जिल्हा परिषद  सदस्य प्रभाकर म्हात्रे , ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड,  अलिबाग गटविकास अधिकारी  दीप्ती पाटील, नितीन मंडलिक आदी यावेळी उपस्थित होते.
           जिल्हा परिषद  संघटनेचे रायगड जिल्हा अध्यक्ष  राजेंद्र गायकवाड, पाणी व स्वच्छता विभागाचे जयवंत गायकवाड , मुख्य लेखा वित्त अधिकारी दत्तात्रेय पाथरुट, पशुसंवर्धन अधिकारी बंकट आर्ले, मेघा म्हात्रे यांनी मनोगत वक्त करून प्रकाश खोपकर यांना शुभेच्छा दिल्या.  सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन अमरदीप ठोंबरे यांनी केले.
          प्रकाश खोपकर 1989 साली जिल्हा परिषदेच्या सेवेत रूजू झाले. त्यांनंरत त्यांनी गटविकास अधिकारी ,  उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रशासन, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत, प्रकल्प अधिकारी ग्रामिण विकास यंत्रणा, माध्यमिक शिक्षण अधिकारी या पदावर काम केले आहे.
           " जिद्दीला कतृत्वाची जोड दिल्यामुळेच मी या पदापर्यंत योऊन पोहचलो. ही जिल्हा परिषद आपली आहे असे समजून काम  केले. माझी बदली झाल्यामुळे मी धुळ्याला जात आहे. माझा जन्म रायगडमधला आहे.  या मातीशी माझे नाते आहे.  त्यामुळे निवृत्तीनंतरचा माझा निरोप समरंभा रायगड जिल्ह्यातच करणार."
 प्रकाश खोपकर , उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजिप 
 

Post a comment

0 Comments