लासुर स्टेशन ते वैजापूर रस्त्यासाठी परीसरातील तरुणांचा आक्रोशशिवना पुलावर परिसरातील तरुणांचे रस्ता रोको आंदोलन


वैजापूर(प्रतिनिधी/राहुल त्रिभुवन) : 
रविवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास मुंबई नागपूर मार्गावरील शिवना  पुल येथे परिसरातील तरुणांच्या वतीने रस्ता रोको करण्यात आले. 
वैजापूर ते लासुर स्टेशनकडे जाणारा मुंबई नागपूर महामार्गावर मोठाले खड्डे पडल्याने प्रवासामध्ये  जिव मुठीत धरून वाहन चालावे लागत आहे.
 महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळचे अधिकारी झोपेचे सोंग घेत असल्याने तरुणांनी या महामार्गावर  रस्ता रोको आंदोलन केले. यात राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अभियंता पाटील यांना निवेदन देण्यात आले.मुंबई नागपूर महामार्गाहुन शिर्डी कडे जाणाऱ्या भाविकांना जाण्यासाठी तसेच औरंगाबाद, वाळुज, पंढरपूर आदी ठिकाणच्या कारखान्याच्या माल वाहतूकीचे जड वाहन याच महामार्गावरून ये-जा करतात, त्याचप्रमाणे इतर महामार्गा पेक्षा र्सोईस्कर व कमी अंतर असलेला महामार्ग आहे यामुळे रात्र-दिवस वाहनांची मोठी वर्दळ या ठिकाणी असते. 
नागपूर मुंबई महामार्गावर मोठ-मोठे,जिव-घेणे खड्डे पडले असून महामार्गावरून वाहन चालवणे म्हणजे वाहन धारकांना मुत्यु ला निमंत्रण देण्या सारखेच आहे
 या महामार्गावर दररोज छोटे-मोठे अपघात होतात तसेच गाडीचे टायर फुटने, पम्चंर होणे. नागपूर मुंबई महामार्गाची दयनीय अवस्था झाल्याने संतप्त तरूणांनी हे आंदोलन तीव्र केल्याने या ठिकाणी लोकप्रतिनीधी व नॅशनल हायवे प्राधिकरण अधिकारी  पाटील यांनी लेखी स्वरूपात हमी दिल्यानंतर व आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले यात येत्या आठ दिवसांत खड्डे बुजवण्याचे काम हाती घेऊन पूर्ण केल्या जाईल तसेच येत्या दोन महिन्यात हा रस्ता पूर्ण डांबरीकरण करण्यात येईल. यावेळी वैजापुर चे  उपविभागीय पोलीस अधिकारी गोपाल रांजनकर व पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली वैजापूर पोलीस प्रशासन  चोख बंदोबस्त ठेऊन होते.तसेच साथरोग प्रतिबंधक व जमावबंदी कायद्याचे उल्लंघन केल्यामुळे आंदोलनं कार्यकर्त्याविरोधत वैजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या वेळी संतोष पाटील जाधव, प्रा. आर. बी. शेळके सर, मनाजी पाटील मिसाळ, पंकज ठोंबरे , बाळू पाटील शेळके,कल्याण पाटील दांगोडे, ईश्वर तांबे,अनिल पाटील वाणी, डॉ. साबळे, राहुल साबळे, अशोक पाटील चव्हाण तसेच अनेक गावातील सरपंच व सर्व सामान्य नागरिक यात सहभागी झाले होते.

Post a comment

0 Comments