वैजापुर पोलिसांचे अवैध दारू विक्री विरुद्धच्या कारवाई चे सत्र सुरूच


                                                                                          वैजापूर(प्रतिनिधी/राहुल त्रिभुवन ) :

                                                                                             वैजापुर दिनांक 11 ऑगस्ट,रोजी वैजापुर पोलिसांनी चोरून दारू विक्री करणाऱ्या विरोधात कारवाई केली. 
औरंगाबाद शहरातील वाढता प्रादुर्भाव लक्ष्यात घेता वैजापुर पोलीस प्रशासन चोख बंदोबस्त ठेऊन आहे. वैजापुर चे उपविभागीय पोलीस अधिकारी गोपाल रांजणकर ,पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रमेश जाधवर,बिट जमादार मोईस बेग,हेड कॉन्स्टेबल यांचे पथक अवैध दारू विक्री चालणाऱ्या प्रत्येक ठिकाणी नजर ठेवून आहे.तसेच त्यांच्या कारवाईचे सत्र सुरूच आहे.खंडाळा, बोरसर,भिवगाव अन आता भायगाव फाटा या ठिकाणी सुद्धा वैजापुर पोलिसांनी अवैद्य दारू विक्री साठी बाळगणाऱ्या विरोधी कारवाई केली. वैजापूर पोलीस प्रशासन नेहमीच सतर्क आहे व संसर्ग होऊ नये,एकत्रित जमा होऊ नये यासाठी कर्तव्य दक्ष आहे . वैजापुर मधील भायगाव फाटा या ठिकाणी मिळालेल्या खबरीकडून माहिती आधारे पोलीस उपनिरीक्षक रमेश जाधवर व  बिट जमादार मोईस बेग व पोलीस कर्मचारी यांनी तात्काळ कारवाई करण्यासाठी गेले असता   अवैध रित्या  दारू विक्री करणारे दोघेही तेथून पोलिसांना पाहून पळून गेले. म्हणून त्या दोनही व्यक्तिविरोधात  मु प्रो का.कलम 65 ई नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a comment

0 Comments