करमाड येथील नितीन देशमुख मित्र मंडळाकडून गरजु शेतकऱ्याला आधार  *(प्रतिनिधी गजानन इधाटे)* 

औरंगाबाद -
   लाॅकडाऊन चालू असल्यानेे हाताला काम नव्हते त्यामुळे आर्थिक स्थिती कोलमडली होती.  सतत विचार पडायचा की आता जमिन कशी पेरायची पण मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांच्याकडून मोफत बाजरी बियाणे मिळाले.  त्यानंतर मा. नितीन देशमुख(बंटी भाऊ )मित्र मंडळ यांच्याकडून मोफत खते मिळाल्याने मोठी मदत झाली आहे.
    औरंगाबाद येथुन जवळच असलेल्या करमाड येथील शेतकरी आर्थिक संकटात सापडला होता त्यामुळे सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणारे नितीन देशमुख मित्र मंडळाकडून मदत झाल्याने व आमदार सतीश चव्हाण यांच्याकडून वाटप करण्यात आलेल्या बाजरी पिकाचे वाण यामुळे शेतकऱ्यांचे बाजरीचे पीक चांगल्या प्रकारे बहरले आहे.
      करमाड येथील आदिवासी समाजातील शेतकरी मच्छिंद्र गायकवाड यांनी सांगितले की, लॉकडाऊनच्या या काळात आर्थिक परिस्थिती खराब झाली होती त्यामुळे शेती कशी पिकवायची हा प्रश्न निर्माण झाला होता मात्र आमदार सतीश चव्हाण यांच्याकडून बाजरीचे मोफत बियाणे मिळाले व नितीन देशमुख मिञ मंडळ यांच्याकडून बाजरीसाठी खते मिळाली त्यामुळे माझ्या शेतात बहरलेलं पीक बघून मला व कुटुंबाला खुप आनंद होत आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते व नितीन देशमुख मित्र मंडळाचे अध्यक्ष सचिन अवचरमल यांची खुप मदत झाली .

Post a comment

0 Comments