गृह विभागाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करीत गणेशोत्सव व मोहरम घरातच साधेपणाने साजरे करा - जिल्हाधिकारी सुनील चव्हाण


औरंगाबाद,  :- कोरोना संसर्ग रोखण्यासाठी व प्रादुर्भाव वाढणार नाही यांची दक्षता घेत सर्वांनी शासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करीत येणारा गणेशोत्सव आणि मोहरम सण सामाजिक भान राखत साधेपणाने घरातच साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे.
आज जिल्हा पोलीस अधीक्षक (ग्रामीण) कार्यालयामार्फत आयोजित सार्वजनिक गणोशोत्सव व मोहरम मध्यवर्ती शांतता समितीची बैठक जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्येक्षतेखाली एम.जी.एम.महाविदयालयाच्या  रूख्मिनी सभागृहत पार पाडली. यावेळी पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील,अप्पर पोलीस अधीक्षक  गणेश गावडे, उपविभागीय पोलीस अधिकारी (पैठण) गोरख भामरे, विभागातील  पोलीस अधिकारी, भगवान फॉर्मसी महाविदयालयाचे विभाग प्रमुख नानासाहेब धारवाले,  जिल्हा, तालुक्यातील गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष, सरपंच, ग्रामपंचयात, पंचायत समिती अध्यक्ष व सदस्य संबधित गावाचे पोलीस पाटील आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री. चव्हाण यांच्या हस्ते कोरोना योध्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. चव्हाण म्हणाले की, आपण दरवर्षी सण-उत्सव मोठया उत्सावाने साजरे करीत असतो. परंतू यावर्षी कोरोनाचे संकट असून या संकटाने आपल्या सर्वांना खुप काही शिकवले आहे. कोरोनामुळे आपल्या जीवणाची दशा आणि दिशा बदलेली आहे. पोलीस प्रशासन आणि पोलीसांनी सैनिकांप्रमाणे काम करीत माणुसूकीचे दर्शन घडविले आहे, असे म्हणत जिल्हाधिकारी यांनी त्यांचे कौतुक केले. तसेच बऱ्याच गावांतील गणेशोत्सव मंडळानी यावर्षी हे सण साजरे न करण्याचा निर्णय घेतला त्यांचेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी कौतूक केले. त्याच बरोबर जे गणेशोत्सव, मोहरम साजरा करीत आहे त्यांनी मार्गदर्शक सुचनांचे काटेकोर पालन करीत प्रशासकीय सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री.चव्हाण यांनी केले. कोरोना संकटातून बाहेर पडतांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी महाराष्ट्र कौशल्य विकास उपक्रमाच्या माध्यमातून उद्योगांना उभारी देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच पाणी पुरवठा योजना, कृषी क्षेत्र यांना नवसंजीवनी  देण्याचा प्रयत्न असल्याचे श्री.चव्हाण यांनी सांगितले.

Post a comment

0 Comments